‘आहे त्यात खूश’, भारताच्या ‘उसेन बोल्ट’ने क्रीडा मंत्रालयाची ऑफर फेटाळली

| Updated on: Feb 17, 2020 | 5:25 PM

श्रीनिवासने क्रिडा मंत्रालयाची ऑफर फेटाळली आहे (shrinivas gowda rejects kiren rijiju offer).

आहे त्यात खूश, भारताच्या उसेन बोल्टने क्रीडा मंत्रालयाची ऑफर फेटाळली
Follow us on

बंगळुरु : पारंपरिक म्हशींच्या शर्यतीत (कंबाला) अवघ्या 13.62 सेकंदात 142.5 मीटरचं अंतर पार करणाऱ्या श्रीनिवास गौडाला उर्फ भारताच्या ‘उसेन बोल्ट’ला क्रीडा मंत्रालयाने चाचणीसाठी बोलवले होते. मात्र, श्रीनिवासने क्रीडा मंत्रालयाची ही ऑफर फेटाळली आहे (shrinivas gowda rejects kiren rijiju offer).

“मी आहे त्यात खूश आहे. मला कोणतीही चाचणी द्यायची नाही”, असं श्रीनिवास म्हणाला. याशिवाय ट्रॅक आणि फिल्ड रेसिंगमध्ये भाग घेणाऱ्या अॅथलिट्सपेक्षा म्हशींची शर्यंत कशी वेगळी आहे, याबाबत त्याने स्पष्टीकरण दिलं (shrinivas gowda rejects kiren rijiju offer).

“कंबालामध्ये चाकं महत्त्वाची भूमिका निभवतात तर ट्रॅक रेसमध्ये पायाची टाच महत्त्वाची भूमिका निभवतात. फक्त घोडेच नाही तर म्हशींचंदेखील कंबालामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र, ट्रॅक रेसमध्ये तसं काही नसतं”, असं श्रीनिवास म्हणाला.

कर्नाटकात दरवर्षी पारंपरिक म्हशींची शर्यती आयोजित करण्यात येते. या खेळाला कर्नाटकात कंबाला असं म्हणतात. याच कंबाला स्पर्धेत श्रीनिवास गौडाने भाग घेतला होता. त्याने प्रचंड वेगात धावून ही शर्यत जिंकली. त्याचा शर्यतीत धावण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर तो प्रचंड चर्चेत आला. श्रीनिवासने फक्त 9.55 सेकंदात 100 मीटरचं अंतर पार केलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जाऊ लागलं. तर काही लोकांनी श्रीनिवासची तुलना थेट ऑलंम्पियन उसेन बोल्टशी तुलना केली.

श्रीनिवासची कामगिरी बघून क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी ट्वीट करत श्रीनिवासचं कौतुक केलं. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियातील अव्वल प्रशिक्षकांमार्फत श्रीनिवासची चाचणी घेतली जाईल, असे रिजेजू म्हणाले. त्यानंतर त्यांना क्रिडा मंत्रालयाची चाचणीसाठी ऑफर मिळाली. मात्र, ती ऑफर श्रीनिवासने फेटाळली.

काय आहे कंबाला?

कंबाला या स्पर्धेत चिखलाने भरलेल्या शेतात दोन म्हशींसोबत स्पर्धकाला धावायचे असते. ही स्पर्धा दक्षिण कन्नड आणि उड्डुपी येथील तटीय जिल्ह्यात भरवली जाते. यामध्ये स्पर्धकांना 123 ते 142 मीटर चिखलाने भरलेले अंतर म्हशीच्या जोड्यासोबत धावून पार करायचे असते.