‘सिद्धू, आमीर आणि नसिरुद्दीन शाह देशद्रोही’

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इंद्रेश कुमार यांनी काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू, अभिनेता आमीर खान आणि नसिरुद्दीन शाह यांची तुलना राजपूत राजा जयचंद आणि बंगालच्या नजाफी नवाब मीर जाफर यांच्याशी करत, त्यांना देशद्रोही संबोधलं आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ इथं एका कार्यक्रमात इंद्रेश कुमार यांनी हे वक्तव्य केलं. […]

सिद्धू, आमीर आणि नसिरुद्दीन शाह देशद्रोही
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इंद्रेश कुमार यांनी काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू, अभिनेता आमीर खान आणि नसिरुद्दीन शाह यांची तुलना राजपूत राजा जयचंद आणि बंगालच्या नजाफी नवाब मीर जाफर यांच्याशी करत, त्यांना देशद्रोही संबोधलं आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ इथं एका कार्यक्रमात इंद्रेश कुमार यांनी हे वक्तव्य केलं.

इंद्रेश कुमार म्हणाले, देशासाठी मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबसारखे नव्हे तर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे मुस्लिम हवे आहेत. कसाब किंवा इशरत जहाँसारखे मुस्लिम तरुण नको तर कलामांच्या विचारावर चालणारे मुस्लिम तरुण हवेत, असं इंद्रेश कुमार यांनी नमूद केलं. जे कसाबच्या मार्गावर चालतील त्यांना देशद्रोही संबोधलं जाईल.

त्यानंतर इंद्रेश कुमार यांनी सिद्धू, आमीर आणि नसिरुद्दीन शाह यांच्याबाबत भाष्य केलं. हे तिघेही चांगले अभिनेते असू शकतात, मात्र ते देशद्रोही आहेत. त्यामुळे ते सन्मानास पात्र नाहीत. ते मीर जाफर आणि जयचंद्रसारखे आहेत.