फोटोवरुन मुलीला चिडवणाऱ्यांना स्मृती इराणी यांचं रोखठोक उत्तर

| Updated on: Jun 21, 2019 | 7:30 PM

जोईशने आईला सांगून तो फोटो डिलीट केला. स्मृती इराणींनी लेकीच्या सांगण्यावरुन फोटो डिलीट केला तर खरा, पण नंतर त्यांनी पुन्हा फोटो अपलोड केला.

फोटोवरुन मुलीला चिडवणाऱ्यांना स्मृती इराणी यांचं रोखठोक उत्तर
Follow us on

मुंबई : केंद्रीय वस्त्रोद्योग, महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी लेकीला ट्रोल करणाऱ्यांना दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आहे. स्मृती इराणी यांनी आपली लेक जोईश इराणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. मात्र जोईशच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी तिला त्या फोटोवरुन चिडवायला सुरु केलं.

त्यामुळे जोईशने आईला सांगून तो फोटो डिलीट केला. स्मृती इराणींनी लेकीच्या सांगण्यावरुन फोटो डिलीट केला तर खरा, पण नंतर त्यांनी पुन्हा फोटो अपलोड केला. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन लिहून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं.

“माझ्या मुलीसोबतचा सेल्फी मी डिलीट केला होता. त्याचं कारण म्हणजे काही आगाऊ मुलं तिला तिच्या लूकवरुन चिडवत होते. इतकंच नाही तर आपल्या आईसोबतच्या सेल्फीत ती कशी दिसते हे सर्वांनी बघा असं सांगत सुटले होते. माझ्या मुलीने मला तो फोटो हटवण्यास सांगितला. मी फोटो डिलीट केला कारण मी तिला रडताना पाहू शकत नाही.

नंतर मला जाणीव झाली की मी फोटो डिलीट करुन मी त्या मुलांना प्रोत्साहनच देत आहे. मिस्टर झा (कमेंट करणारा मुलगा), माझी मुलगी स्पोर्टपर्सन आहे. तिच्या विक्रमाची लिमका बूकमध्ये नोंद आहे. शिवाय कराटेमध्ये तिने ब्लॅक बेल्ट मिळवला असून, वर्ल्ड चॅम्पियन्सशीपमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. ती खूपच प्रेमळ आणि सुंदर आहे. तिच्याबद्दल जे बोलायचं आहे ते बोला, ती पुन्हा लढेल, ती जोईश इराणी आहे आणि मला गर्व आहे की मी तिची आई आहे”

स्मृती इराणी यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर लाईक मिळत आहे. अनेकांनी स्मृती इराणींनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करत आहेत.

अमेठीत विजय

स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभव केला. देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षनेत्याचा त्यांनी पराभव केला.