साताऱ्यात आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाबाबत धक्कादायक माहिती

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

सातारा : लग्नासाठी स्थळ येत नाही म्हणून जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना साताऱ्यात घडली. आरोपी मुलाने दगडाने केलेल्या मारहाणीत वडीलही जखमी झाले. या घटनेमुळे वाई तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी भुईंज पोलिसांनी नराधम मुलाला अटक केली आहे.  माणुसकीला काळिमा फासणारी घटना वाई तालुक्यात घडली. पोटच्या मुलानेच आईवर बलात्कार केल्याने परिसरात खळबळ […]

साताऱ्यात आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाबाबत धक्कादायक माहिती
Follow us on

सातारा : लग्नासाठी स्थळ येत नाही म्हणून जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना साताऱ्यात घडली. आरोपी मुलाने दगडाने केलेल्या मारहाणीत वडीलही जखमी झाले. या घटनेमुळे वाई तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी भुईंज पोलिसांनी नराधम मुलाला अटक केली आहे.  माणुसकीला काळिमा फासणारी घटना वाई तालुक्यात घडली. पोटच्या मुलानेच आईवर बलात्कार केल्याने परिसरात खळबळ उडाली. संदीप सूर्यवंशी असे त्या मुलाचे नाव आहे.

आई आणि वडिल एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी गावी गेले होते. तेथील गावदेव करुन झाल्यावर आरोपीची आई एकटीच घरी आली. यावेळी तिचा संशयित आरोपी मुलगा संदीप हा घराच्या ओट्यावर बसला होता. आई घरात गेल्यानंतर तो ही घरात गेला आणि त्याने आतून कढी लावली. यावेळी त्याने जबरदस्ती करत स्‍वत:च्या आईवरच बलात्कार केला.

त्याच्या आईने आरडाओरडा केला. शेजारच्या लोकांनी या घटनेची माहिती संशयिताच्या वडिलांना दिली. त्याच्या वडिलांनी मुलाला केलेल्‍या कृत्‍याचा जाब विचारल्यावर मुलाने वडिलांनाही दगड मारुन जखमी केले. घडलेल्या घटनेनंतर पीडित महिलेने भुईंज पोलिस ठाण्यात स्‍वत:च्या मुलाने केलेल्‍या या घृणास्‍पद कृत्‍याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेनंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकाराबाबत नातेवाईकांकडून आरोपीविषयी मिळालेली माहिती धक्कादायक आहे. आरोपीचे वय 27 वर्षे होऊन सुध्दा लग्न ठरत नसल्याने तो दारूच्या आहारी गेला होता. तो विक्षिप्त वागत असल्यामुळे त्याचे लग्न ठरत नव्हते. यामुळे घरातील आई वडील हताश झाले होते. दारु पिऊन आई वडिलांना रोज त्रास देणे, मारहाण करणे, लग्न का होत नाही याचा त्यांनाच जाब विचारत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.

मात्र अशा घृणास्पद कृत्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.