कोल्हापूरच्या फुटबॉलला भुताने झपाटलं, जिंकण्यासाठी सॉक्समध्ये लिंबू, अंधश्रद्धेचा कळस

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

कोल्हापूर: कोल्हापूरच्या फुटबॉलची ओळख देशभर आहे. ज्या देशात क्रिकेटची घराघरात पूजा केली जाते, त्या देशातल्या कोल्हापुरात मात्र फुटबॉल हा तरुणांच्या नसासनात भिनला आहे. मात्र आता कोल्हापूरच्या फुटबॉलला भुतानं झपाटलं का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण खेळाडू सॉक्समध्ये लिंबू घेऊन मैदानात उतरत आहेत. ही दृश्य कोल्हापुरातल्या शाहू स्टेडियमवर पाहायला मिळत आहेत. ज्या कोल्हापुरात पेठा-पेठांमध्ये फुटबॉलची […]

कोल्हापूरच्या फुटबॉलला भुताने झपाटलं, जिंकण्यासाठी सॉक्समध्ये लिंबू, अंधश्रद्धेचा कळस
Follow us on

कोल्हापूर: कोल्हापूरच्या फुटबॉलची ओळख देशभर आहे. ज्या देशात क्रिकेटची घराघरात पूजा केली जाते, त्या देशातल्या कोल्हापुरात मात्र फुटबॉल हा तरुणांच्या नसासनात भिनला आहे. मात्र आता कोल्हापूरच्या फुटबॉलला भुतानं झपाटलं का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण खेळाडू सॉक्समध्ये लिंबू घेऊन मैदानात उतरत आहेत. ही दृश्य कोल्हापुरातल्या शाहू स्टेडियमवर पाहायला मिळत आहेत.

ज्या कोल्हापुरात पेठा-पेठांमध्ये फुटबॉलची क्रेझ आहे, त्याच कोल्हापुरात असे प्रकार आता पाहायला मिळत आहेत. कोल्हापुरात देश विदेशातील खेळाडू खास फुटबॉल खेळण्यासाठी येतात. इथले अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. भारतीय संघातदेखील एका खेळाडूचा समावेश आहे. मात्र त्याचवेळी सॉक्समध्ये लिंबू घेऊन खेळण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. त्यामुळं कोल्हापूरच्या फुटबॉलला भुतानं झपाटलंय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.जो संघ मैदानात लिंबू घेऊन उतरेल तो जिंकतो अशी अंधश्रद्धा कोल्हापुरात रुजू लागली आहे. त्यामुळं ज्येष्ठ खेळाडूंकडून या संदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे.

सॉक्समध्ये लिंबू घेऊन उतरलेला हा खेळाडू परदेशी होता. ते प्रेक्षकांच्या स्पष्ट लक्षात आले. त्यानंतर पंचांनी लगेच त्या खेळाडूला यलो कार्ड दाखवून कारवाई केली. अशा पद्धतीनं मैदानात उतरणं हे खेळाच्या पूर्णपणे चुकीचं असल्याचं पंचांचं मत आहे.

कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे तशी फुटबॉलचीही पंढरी समजली जाते. अनेक शहरातून याठिकाणी खेळाडू फुटबॉल खेळण्यासाठी येतात. मात्र नुकतीच घडलेली घटना कोल्हापूरसाठी मारक आहे.जर लिंबू घेऊन सामना जिंकता आला असता तर हा खेळच नावारुपाला आला नसता. याचं भान आता प्रत्येक खेळाडून ठेवलं पाहिजे.

VIDEO: