रागाच्या भरात  मुलाने पित्याला संपवलं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नागपूर : रागाच्या भरात  मुलानेच दारुड्या वडिलांची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली. संतोष बेनिबागडे असे मृत पित्याचे नाव आहे, तर सचिन बेनिबागडे (21 वर्ष) असे आरोपी मुलाचे नाव आहे. संतोष बेनिबागडे हे दारु पिऊन घरी आले. त्यावेळी त्यांच्यात आणि सचिनमध्ये वाद झाला. या वादात रागाच्या भरात सचिनने वडिलांवर लोखंडी रॉडने जोरदार वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू […]

रागाच्या भरात  मुलाने पित्याला संपवलं
Follow us on

नागपूर : रागाच्या भरात  मुलानेच दारुड्या वडिलांची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली. संतोष बेनिबागडे असे मृत पित्याचे नाव आहे, तर सचिन बेनिबागडे (21 वर्ष) असे आरोपी मुलाचे नाव आहे. संतोष बेनिबागडे हे दारु पिऊन घरी आले. त्यावेळी त्यांच्यात आणि सचिनमध्ये वाद झाला. या वादात रागाच्या भरात सचिनने वडिलांवर लोखंडी रॉडने जोरदार वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सचिनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील बिडगाव येथे 50 वर्षीय संतोष बेनिबागडे त्याच्या दोन मुलांसह राहत होते. मोठा मुलगा मनोज याचे लग्न झाले आहे, तर लहान मुलगा सचिन खासगी कंपनीत काम करतो. संतोषला दारूचे व्यसन होते. त्यामुळे कुटुंबात यावरुन नेहमी भांडणे होत होती. संतोषच्या दारूच्या व्यसनापायी त्याची पत्नी भावाकडे राहायला गेली होती.

शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या संतोषचे लहान मुलगा सचिन सोबत वाद झाला. या वादात रागाच्या भरात सचिनने वडील संतोषवर लोखंडी रॉडने जोरदार वार केल्याने संतोषचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी आरोपी मुलगा सचिन विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

नागपुरातील गुन्हेगारी कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस नागपुरातील गुन्हेगारी वाढतच चालली आहे. मुख्यमंत्र्याचं होमग्राउंड असलेलं नागपूर सध्या गुन्हेपूर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येथील पोलीस प्रशासनाच्या कामावर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जर आताही नागपूर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पाऊल उचलले नाही तर, हे शहर ऑरेंज सीटी म्हणून नाही तर गुन्हे सीटी प्रसिद्ध होईल.