प्रचारासाठी चोरीच्या गाड्यांचा वापर?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष उमेदवाराचा जोरदार प्रचार करत आहे. या प्रचारादरम्यान उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रोड शोच्या माध्यामातून वाहनांचा वापर करतात. मात्र याच दरम्यान मुंबई क्राईम ब्रँचला एक माहिती मिळाली आहे की, निवडणुकींच्या प्रचारासाठी चोरी केलेल्या गाड्यांची 30 टक्क्यांनी मागणी वाढली आहे. अशी माहिती मिळताच क्राईम […]

प्रचारासाठी चोरीच्या गाड्यांचा वापर?
Follow us on

मुंबई : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष उमेदवाराचा जोरदार प्रचार करत आहे. या प्रचारादरम्यान उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रोड शोच्या माध्यामातून वाहनांचा वापर करतात. मात्र याच दरम्यान मुंबई क्राईम ब्रँचला एक माहिती मिळाली आहे की, निवडणुकींच्या प्रचारासाठी चोरी केलेल्या गाड्यांची 30 टक्क्यांनी मागणी वाढली आहे. अशी माहिती मिळताच क्राईम ब्रँचने शहरातील अनेक ठिकाणी गस्त वाढवली आहे आणि लोकांना आपली स्वतःच्या वाहनांची सुरक्षा करण्याचा संदेश पोलीस देत आहेत.

निवडणुका जवळ आल्यावर नेत्यांसोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये वाढ होते. नेत्यांच्या गाड्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या गाड्या दिसतात. मात्र या गाड्यांचे कागदपत्र आहेत का?, हे सांगणं कठीण आहे. बरेच लोक मोठ्या शहरातून स्वस्त दरात गाड्या मिळत असल्याने त्या खरेदी करतात. तर काहीवेळा अशी गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली आहे की, एखादा गुन्हा करण्यासाठीही या चोरीच्या गाड्यांचा वापर केला जातो.

मुंबई , नवी मुंबई , ठाणे  आणि पालघर इथे चोरी झालेल्या गाड्या फक्त मनोरमार्गे गुजरात, राजस्थान, हैदराबाद, बंगळुरु इथे जाऊ शकतात म्हणून पोलिसांनी मनोर येथे महामार्गावर गस्त ठेवण्यात आली आहे. टोल नाके कमीतकमी 5 ते 6 लेन असतात. पण चोरी केलेल्या गाड्या शेवटच्या लेनमधून बाहेर पडतात. यामुळे अनेकदा चोरटे सापडत नाहीत. या चोरी केलेल्या गाड्यांची नंबर प्लेट आणि चेसी बदलून त्या विकल्या जातात.

मुंबई क्राईम ब्रँचला मिळालेल्या माहितीमुळे सर्वांना पोलिसांनी आपली वाहनं सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केलं आहे.