Nashik Jewelers : पीपीई किट घालून चोरट्यांचा ज्वेलर्सवर डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Aug 13, 2020 | 3:38 PM

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सध्या प्रत्येक जण मास्क तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स पीपीई किट घालून वावरताना बघायला मिळत आहे (Theft at a jewelers shop in Nashik).

Nashik Jewelers : पीपीई किट घालून चोरट्यांचा ज्वेलर्सवर डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
Follow us on

नाशिक : कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सध्या प्रत्येक जण मास्क तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स पीपीई किट घालून वावरताना बघायला मिळत आहे (Theft at a jewelers shop in Nashik). नाशिकमध्ये मात्र याच पीपीई किटचा वापर करत चोरट्यांनी नाशिक शहरातील 2 दागिन्यांचे दुकान फोडले आहेत. दरम्यान हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून पोलीस या पीपीई किट धारक चोरट्यांचा शोध घेत आहेत. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा डावा फसला (Theft at a jewelers shop in Nashik).

ही घटना जेलरोड भागातील तेजस्वी ज्वेलर्स आणि काठेगल्लीमधील मोहिनीराज ज्वेलर्स येथे घडली. गेल्या दोन दिवसांमध्ये शहरात ज्वेलरी शॉप फोडण्याची ही तिसरी घटना असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चोरट्यांनी पीपीई किट घालून चोरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात चोरट्यांबद्दल चर्चा सुरु आहे.

नाशिकमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पीपीई किट घालून दोन दागिन्यांचे दुकान फोडले. हा संपूर्ण प्रकार या दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञातांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. चोरटे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

चोरट्यांनी पीपीई किट घालून चोरी केली. पण हे पीपीई किट त्यांच्याकडे आले कसे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

शासनाने दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन करत अर्थात स्वतःची काळजी घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्यांची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या वस्तूंचा येणाऱ्या काळात कसा गैरवापर होऊ शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण या चोरीतून समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

Navi Mumbai Corona | एन-95 मास्क, पीपीई किट्स, मेडिकल गॉगल्स, टाटा कंपनीकडून नवी मुंबई महापालिकेला 1 कोटी 77 लाखांची वैद्यकीय साधनं

नाशिकमध्ये पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीत तब्बल 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन दुकानांवर कारवाई, पीपीई किट घालून थेट कोरोना वॉर्डात