…. तेव्हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर होतो: ए आर रहमान

| Updated on: Jul 05, 2019 | 5:03 PM

मुंबई : ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमानने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. वयाच्या 25 वर्षापर्यंत मनात नेहमी आत्महत्या करण्याचा विचार येत होता, असं ए आर रहमान म्हणाला. “तो काळ संघर्षाचा होता. त्याचवेळी वडिलांचे निधन झाल्याने मी खचलो होतो.  त्यामुळे आत्महत्या करण्यापलिकडे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मात्र, यातून मी बाहेर पडलो” असं रहमानने […]

.... तेव्हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर होतो: ए आर रहमान
Follow us on

मुंबई : ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमानने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. वयाच्या 25 वर्षापर्यंत मनात नेहमी आत्महत्या करण्याचा विचार येत होता, असं ए आर रहमान म्हणाला.

“तो काळ संघर्षाचा होता. त्याचवेळी वडिलांचे निधन झाल्याने मी खचलो होतो.  त्यामुळे आत्महत्या करण्यापलिकडे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मात्र, यातून मी बाहेर पडलो” असं रहमानने सांगितलं.

ए. आर. रहमान म्हणाला की, “आयुष्यात संघर्ष खूप जवळून पाहिला आहे. 25 वर्षापर्यंत  दररोज आत्महत्या करण्याचा विचार मनात घोंघावत होता. या काळात प्रचंड तणावात होतो. याच काळात वडिलांचे निधन झाले. यावेळी 35 चित्रपटांमध्ये गाण्याच्या ऑफर आल्या होत्या, मात्र मी केवळ 2 चित्रपटांना संगीत देऊ शकलो”.

वडिलांच्या निधनानं मी अधिक खचलो होतो, आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती.  पण कालांतराने खचलेल्या परिस्थितीतून बाहेर आलो. जगण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आणि तणावातून बाहेर आलो. त्यानंतर चेन्नई येथील राहत्या घरामागेच ‘पंचथन’ हा रेकॉर्डिंग स्टुडिओ उभा केला, असं रहमानने नमूद केलं.

कृष्णा त्रिलोक लिखीत, लँडमार्क आणि पेंगुईन हाऊस यांच्या मदतीने ए. आर. रहमानवरील बायोपिक “नोट्स ऑफ अ ड्रीम….” या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. या दरम्यान, रहमानने आयुष्यातील कठीण काळातील घटनांचा उलगडा केला.

रहमान हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नावाजलेला संगीतकार आहे. 2009 मध्ये रहमानच्या ‘स्लम डॉग मिलेनिअर’ चित्रपटातील गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला.

रहमानचा जन्म 7  जानेवारी 1967 रोजी तमिळनाडूतील चेन्नई इथे झाला. रहमानचं मूळ नाव ए. एस. दिलीप कुमार आहे, मात्र तो ए. आर. रहमान या नावाने लोकप्रिय आहे. याशिवाय अल्लारखा रहमान, इसाई प्युयल आणि मोझरात ऑफ मद्रास या टोपण नावानेदेखील रहमान ओळखला जातो.