VIDEO : चाऊमीन खाल्यामुळे 3 वर्षीय मुलाचे फुफ्फसं जळाले

| Updated on: Jun 24, 2019 | 12:01 PM

चाऊमीन खाल्यामुळे 3 वर्षीय चिमुकल्याचे फुफ्फुसं फाटले आहे. हा धक्कादायक प्रकार हरयाणाच्या यमुनानगर येथे घडला आहे.

VIDEO : चाऊमीन खाल्यामुळे 3 वर्षीय मुलाचे फुफ्फसं जळाले
Follow us on

हरयाणा : चाऊमीन खाल्यामुळे 3 वर्षीय चिमुकल्याचे फुफ्फुसं फाटले आहे. हा धक्कादायक प्रकार हरयाणाच्या यमुनानगर येथे घडला आहे. या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मुलाचे दोन्ही फुफ्फुस फाटले आहेत. शरीर काळे पडले आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर मुलाल वाचवण्यात यश आलं आहे. मुलाची अवस्था इतकी वाईट होती की, 16 दिवस या मुलाला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

“चाऊमीन खालल्यानंतर काहीवेळाने मुलाची तब्येत बिघडली. 3 वर्षाच्या उस्मानने चाऊमीनमध्ये वापरली जाणारी चटनी अधिक प्रमाणात खाल्ली होती. याशिवाय त्याने बॉटलमधीलही चटनी प्यायली होती. यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अनेक रुग्णालयांनी मुलाला दाखल करण्यासाठी हातवर केल्याने आम्ही गाबा रुग्णालयात आलो. येथे आयसीयूमध्ये उस्मानवर उपचार सुरु केले”, असं मुलाचे वडील मंसूर हसन म्हणाले.

घातक अॅसिडचा वापर

जेव्हा डॉक्टरांनी एक्सरे पाहिले तेव्हा समजले की, उस्मानेचे दोन्ही फुफ्फुसे फाटले आहेत. ऑपरेशननंतर छातीत चेस्ट ट्यूब टाकण्यात आली. या दरम्यान, मुलाल एकदा कार्डियक अटॅकही आला. आता मुलाची परिस्थिती ठीक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

“चाऊमीनमध्ये स्वाद येण्यासाठी घातक अशा अॅसिडचा वापर केला जातो. या अॅसिडमुळे शरीराचे नुकसान होते. यामुळे फुफ्फुसांवर फरक पडतो आणि किडनी खराब होण्याची शक्यता असते”, असं डॉक्टर म्हणाले.