बस कंडक्टरचा चोरीसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप, टीसीला गंडवून लाखोंची लूट

| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या ‘स्टार बस’ला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. कंडक्टरने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करुन, मनपाच्या बस सेवेला लाखो रुपयांचा चुना लावला आहे. बसमध्ये कंडक्टरला मोबाईल वापरण्यास बंदी आहे, तरीही सर्रासपणे मोबाईलचा वापर करुन, यातून व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करण्यात आला आणि अनेक कंडक्टर्सनी मिळून रोज लाखो रुपयांचा आपली बसला चुना लावत होते. काय […]

बस कंडक्टरचा चोरीसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप, टीसीला गंडवून लाखोंची लूट
Follow us on

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या ‘स्टार बस’ला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. कंडक्टरने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करुन, मनपाच्या बस सेवेला लाखो रुपयांचा चुना लावला आहे. बसमध्ये कंडक्टरला मोबाईल वापरण्यास बंदी आहे, तरीही सर्रासपणे मोबाईलचा वापर करुन, यातून व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करण्यात आला आणि अनेक कंडक्टर्सनी मिळून रोज लाखो रुपयांचा आपली बसला चुना लावत होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

‘स्टार बस’ म्हणजेच नागपूरकरांची हक्काची आपली बस. पण ही बससेवा गेल्या काही दिवसांपासून तोट्यात आहे. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही. ‘आपली बस’चं रोज 14 ते 17 लाखांचं उत्पन्न आहे. उत्पन्न वाढ व्हावी म्हणून 22 जानेवारी 2019 पासून तिकीटाच्या दरात वाढ करण्यात आलीय. पण तिकीट दरात वाढ होऊनही बसचं उत्पन्न वाढत नव्हतं, त्यामुळे मनपाच्या परिवहन विभागानं भरारी पथक नेमले. कंडक्टरच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे बसच्या तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचं मनपाच्या लक्षात आलं. मनपाच्या परिवहन विभागासाठी चोरीचा व्हॉटस्अॅप ग्रुप, हा सारा प्रकारच नवीन होता.

असा झाला काळाबाजार

‘आपली बस’च्या कंडक्टरने वेगवेगळ्या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. यात एके-47 आणि केके अशा नावाचे हे व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत. या ग्रुपच्या मदतीने तिकीट तपासणाऱ्या भरारी पथकाचं लोकेशन इतर कंडक्टरला शेअर केलं जात होतं. त्यामुळे भरारी पथकाच्या कारवाईत विनातिकीट प्रवाशी दिसून येत नव्हते. याचा फायदा घेऊन ज्या मार्गावर भरारी पथकं नसतात, त्या मार्गावरील बसमध्ये सर्रासपणे प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना तिकीट दिलं जात नव्हतं. अशा पद्धतीनं आपली बसला रोज लाखो रुपयांचा चुना लावला जात होता. यात सहभागी असलेल्या कंडक्टरवर कारवई केली जाणार आहे.

आतापर्यंत 23 मोबाईल जप्त, आणखी चौकशी सुरु

मनपाच्या ‘आपली बस’मध्ये काळाबाजार करण्यासाठी वापरण्यात येणारे 23 मोबाईल जप्त करण्यात आलेय. या मोबाईलद्वारे व्हॉट्सअॅपवर होत असलेल्या काळ्याबाजाराची चौकशी सुरु झालीय. यात मनपाच्या परिवहन विभागातील आणखी काही मासे अडकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.