VIDEO : ट्रम्पमुळे अॅपल कंपनीच्या सीईओने स्वतःचं नाव बदललं!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अॅपल या जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओने आपलं नाव बदललं आहे. थोडं धक्कादायक आहे ना? पण हे नाव प्रत्यक्षात बदललं नसून, केवळ ट्विटरवर बदललं आहे. अॅपलचे सीईओ टीम कूक यांना एक परिषदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘टीम अॅपल’ म्हणाले. मग काय, टीम कूक यांनी थेट ट्विटरवर आपलं नाव बदलून […]

VIDEO : ट्रम्पमुळे अॅपल कंपनीच्या सीईओने स्वतःचं नाव बदललं!
Follow us on

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अॅपल या जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओने आपलं नाव बदललं आहे. थोडं धक्कादायक आहे ना? पण हे नाव प्रत्यक्षात बदललं नसून, केवळ ट्विटरवर बदललं आहे. अॅपलचे सीईओ टीम कूक यांना एक परिषदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘टीम अॅपल’ म्हणाले. मग काय, टीम कूक यांनी थेट ट्विटरवर आपलं नाव बदलून ‘टीम अॅपल’ केलं.

अमेरिकन वर्कफोर्स पॉलिसी अॅडव्हायझरी बोर्डाची परिषद होती. या परिषदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह तंत्रज्ञानासाह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. अॅपलचे सीईओ टीम कूकही हजर होते. यावेळी टीम कूक यांना उद्देशून बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘टीम अॅपल’.

डोनाल्ड ट्रम्प हे टीम कूक यांना म्हणाले, “टीम अॅपल, आपल्या देशात (अमेरिका) तुम्ही खूप चांगली गुंतवणूक केली आहात. मला तुमचं खूप कौतुक वाटतं.”

अॅपलचे सीईओ टीम कूक यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांची चूकभूल खेळीमेळीत घेतली आणि ट्विटरवर आपलं नाव बदलून ‘टीम अॅपल’ ठेवलं. मात्र, इथे टीम हे नाव आणि पुढे अॅपलचा लोगो ठेवला. त्यामुळे अर्थात, सोशल मीडियावर टीम कूक यांच्या या हजरजबाबीपणाची खूप चर्चा सुरु झाली आहे.

एवढेच नव्हे, तर अनेक नेटिझन्सने यावर विनोदही करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील काही निवडक ट्वीट खालीलप्रमाणे :