सैन्याची कारवाई अजून बाकीच, पण या निर्णयानेच पाकिस्तानमध्ये हाहाःकार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात रोष आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. या हल्ल्यानतंर केंद्र सरकारने पहिला निर्णय घेतला आणि तो म्हणजे पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशन अर्थात एमएनएफ हा दर्जा काढून घेतला. पाकिस्तानवरुन येणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के इम्पोर्ट ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानसाठी […]

सैन्याची कारवाई अजून बाकीच, पण या निर्णयानेच पाकिस्तानमध्ये हाहाःकार
Follow us on

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात रोष आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. या हल्ल्यानतंर केंद्र सरकारने पहिला निर्णय घेतला आणि तो म्हणजे पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशन अर्थात एमएनएफ हा दर्जा काढून घेतला. पाकिस्तानवरुन येणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के इम्पोर्ट ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानसाठी दुष्काळात तेरावा महिना झाला आहे.

भारताने फक्त एमएनएफ दर्जा काढलाय. अजून मिलिट्री कारवाई तर लांबच आहे. पण त्याअगोदरच पाकिस्तानचं कंबरडं मोडल्याचं चित्र आहे. पाकिस्तानविरोधात भारतीय व्यापाऱ्यांमध्येही रोष आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबत व्यवसाय करण्यासाठी भारतीय व्यापाऱ्यांनी नकार दिलाय. पाकिस्तानमधून येणाऱ्या सिमेंटवर ब्रेक लागलाय. भारतीय व्यापाऱ्यांनी पाकिस्तानमधून येणारे सिमेंटचे 600-800 कंटेनर परत पाठवले आहेत.

पाकिस्तानमधील वृत्तपत्र ‘द डॉन’च्या वृत्तानुसार, कराची पोर्ट, कोलंबो आणि दुबई पोर्टवर हे सर्व कंटेनर पडून आहेत. आकडेवारीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिमेंटचा व्यवसाय वर्षाला सात ते आठ कोटी डॉलरचा होता. पण भारतीय व्यापाऱ्यांच्या निर्णयामुळे सात ते आठ कोटी डॉलरचा फटका पाकिस्तानला बसणार आहे. चालू आर्थिक वर्षात जुलै ते जानेवारीपर्यंतच पाकिस्तानने भारतात 6.48 लाख टन सिमेंट निर्यात केलं होतं.

भारतातून टोमॅटो निर्यात बंद, पाकिस्तानची तारांबळ

सिमेंटनंतर शेतकऱ्यांनीही पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतलाय. मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं. येथील शेतकऱ्यांना पाकिस्तानला टोमॅटो न पाठवण्याचा निर्णय घेतलाय. झाबुआमधील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयाचा परिणामही तातडीने जाणवायला लागलाय. एका आठवड्यात पाकिस्तानमध्ये टोमॅटोच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. पुलवामा हल्ल्यापूर्वी इस्लामाबादमध्ये टोमॅटो 60 ते 70 रुपये किलोने मिळायचे. हल्ल्यानंतर दोन दिवसात हा दर 100 ते 110 रुपयांवर गेला आणि आता टोमॅटो 175 रुपयांच्या पुढे गेले आहेत. येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होणार आहे.

टोमॅटोसोबतच लसूण आणि अद्रक बंद झाल्यानेही पाकिस्तानची अडचण झाली आहे. पुलवामा हल्ल्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लसूण 110 रुपये प्रति किलोने सहजपणे उपलब्ध होता. पण भारताकडून पुरवठा बंद झाल्याने दर दीडशे रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर 100 रुपये किलोने विकणारी अद्रक 165 रुपयांच्या पुढे गेली आहे आणि ही वाढ वेगाने सुरु आहे.

खजूरचा व्यापारही कोलमडला

पुलवामा हल्ल्यानंतर खजूरचा व्यापार तर पूर्णपणे कोलमडलाय. वाघा बॉर्डरवर खजूरने भरलेले शेकडो ट्रक उभे आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, एका ट्रकमध्ये 15 लाख रुपयांची खजूर असते. 200 रुपये इम्पोर्ट ड्युटी झाल्यामुळे 15 लाख रुपयांच्या खजूरवर 30 लाख रुपये ड्युटी आकारली जात आहे. पाकिस्तानमधील अनेक खजूर मार्केटमध्ये व्यापार ठप्प झालाय.

आकडेवारीनुसार, भारत आणि पाकिस्तानमध्ये रस्तेमार्गाने 138 वस्तूंची आयात-निर्यात होते. तर जम्मू काश्मीर आणि वाघा बॉर्डरहून भारत-पाकिस्तानमध्ये रोज 50 ते 60 ट्रेक ये-जा करतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या दोन प्रमुख व्यापारी मार्ग आहेत. ज्यापैकी एक म्हणजे मुंबईहून समुद्रीमार्गे कराची पोर्ट आणि गुजरातमधील पूछ आणि उरीहून व्यवसाय केला जातो. हे दोन मार्ग जम्मू काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये व्यवसाय करण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. राजकीय संबंध सर्वसामान्य असतात तेव्हा या मार्गांवरुन व्यापार मोठ्या प्रमाणात वाढतो. तर एखादी दहशतवादी घटना घडली तर व्यापार बंद केला जातो.

आपण पाकिस्तानकडून 19 प्रमुख वस्तूंची आयात करतो, ज्यामध्ये ताजी फळे, सिमेंट, खनिज आणि लोह, तयार लेदर, प्रक्रिया केलेलं अन्न, अकार्बनिक रसायने, कच्चा कापूस, मसाले, लोकर, रबर उत्पादने, अल्कोहोल पेय, वैद्यकीय उपकरणे, समुद्री साहित्य, प्लास्टिक आणि क्रीडा साहित्याचा समावेश आहे. पाकिस्तानहून येणाऱ्या सिमेंटवर इम्पोर्ट ड्युटी वाढवल्याचा सर्वात मोठा परिणाम झालाय.

भारतातून पाकिस्तानमध्ये साखर, चहा, तेल, इंधन, कच्चा कापूस, सुती कपडा, टायर, रबर, रसायने यासह विविध 14 वस्तू निर्यात केल्या जातात. 2015-16 मध्ये बारताने जवळपास 46 लाख डॉलरची साखर पाकिस्तानमध्ये पाठवली होती. टी बोर्डच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये पाकिस्तानला भारताने 1.58 कोटी किलो साखर विकली, जी 2017 च्या तुलनेत 1.54 कोटी किलो अधिक आहे. भारतातून पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोची निर्यात होते.