“कोरोनाच्या नावाखाली जबाबदारी झटकू नका”, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत विकसित देशांना सुनावले

| Updated on: Nov 13, 2020 | 3:51 PM

कोरोना विषाणू महामारीचे कारण देऊन विकसित देश पर्यावरणाची जबाबदारी झटकू शकत नाहीत, अशा शब्दात भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत खडे बोल सुनावले. (India warns developed countries should not blame on corona for responsibility of corona)

कोरोनाच्या नावाखाली जबाबदारी झटकू नका, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत विकसित देशांना सुनावले
Follow us on

नवी दिल्ली: कोरोना विषाणू महामारीचे कारण देऊन विकसित देश पर्यावरणाची जबाबदारी झटकू शकत नाहीत, अशा शब्दात भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत खडे बोल सुनावले. भारताचे प्रतिनिधी राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी विकसित राष्ट्रांना पर्यावरण संवर्धनाच्या जबाबदारीची जाणीव करुन दिली. कोरोना विषाणूचे कारण देऊन विकसित देश जबाबदारी सोडू शकत नाहीत. पर्यावरणाच्या संदर्भातील होणाऱ्या परिषदांचे महत्व कमी करु शकत नाहीत, अशी बाजू भारताकडून मांडण्यात आली.  (India warns developed countries should not blame on corona for responsibility of corona)

जी-77 च्या परिषदेमध्ये टी.एस. तिरुमूर्ती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांनी पर्यावरण संदर्भातील परिषदांचे महत्व कमी करु शकत नाहीत, असं विकसित देशांना सुनावले.

संयुक्त राष्ट्रामधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी 2030 साठी भारताच्या विकासाचे धोरण, पॅरिस करार यासंबंधी मांडणी केली. यादृष्टीनं विकासाची कामं केली पाहिजेत, असं तिरुमूर्ती म्हणाले. आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्समध्ये भारतानं 1.7 बिलीयन डॉलर्सची गुतंवणूक व्हावी, अशी मागणी केली होती, याची आठवण भारतातर्फे करुन देण्यात आली.

कोरोना विषाणूमुळे विकसित देश त्यांची प्रगती थांबवू शकतात. मात्र, त्यामुळे लाखो लोक गरिबीकडे ढकलले जातील, असं तिरुमूर्ती म्हणाले. कोरोना सारख्या संकटाच्या काळात विकसित देशांनी गरीब आणि विकसनशील देशांना मदत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगतिले.

दरम्यान, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 5 लाखांच्या खाली आहे. भारतात सध्या 4 लाख 84 हजार 547 कोरोना रुग्ण आहेत. गुरुवारी 44,879 नवीन रुग्ण वाढले आहेत. या तुलनेत गेल्या 24 तासांत 49,079 रुग्ण बरे झाले आहेत. नवीन रुग्ण संख्येपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक हा भारतातील कल सलग 41 व्या दिवशी कायम आहे.  भारतात एकूण 81,15,580 एवढे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 92.97% इतका आहे.

संबंधित बातम्या:

Corona Vaccine | सीरम इन्स्टिट्यूट आणि ICMR ची मोठी घोषणा, लवकरच कोविशील्‍ड लसीची अंतिम चाचणी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त

(India warns developed countries should not blame on corona for responsibility of corona)