‘Tv9 मराठी’ इफेक्ट : मोफत औषधांसाठी पैसे उकळणाऱ्या डॉक्टरला बेड्या

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

पालघर : आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यामधील आदिवासी जनतेच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करत आहे. असे असताना आरोग्य सेवा रुग्णांना मोफत मिळणे अपेक्षित आहे. मात्र पालघर तालुक्यातील मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर औषधोपचारासाठी गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील डॉक्टर रुग्णांकडून इंजेक्शनसाठी 10 रुपये तर सलाईन लावण्यासाठी 80 रुपये शुल्क […]

Tv9 मराठी इफेक्ट : मोफत औषधांसाठी पैसे उकळणाऱ्या डॉक्टरला बेड्या
Follow us on

पालघर : आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यामधील आदिवासी जनतेच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करत आहे. असे असताना आरोग्य सेवा रुग्णांना मोफत मिळणे अपेक्षित आहे. मात्र पालघर तालुक्यातील मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर औषधोपचारासाठी गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील डॉक्टर रुग्णांकडून इंजेक्शनसाठी 10 रुपये तर सलाईन लावण्यासाठी 80 रुपये शुल्क आकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे पैसे इंजेक्शन रुममध्ये ठेवलेल्या दानपेटीसदृश पेटीत टाकण्यासाठी रुग्णांना प्रवृत्त केले जात होते. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी अचानक दिलेल्या भेटीत हे प्रकरण समोर आले.

या संदर्भात पालघरच्या जिल्हा आरोग्य विभागाने या आरोग्य केंद्रावर धाड टाकून ही कारवाई केली. पालघर जिल्ह्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांना या कारवाईमुळे चांगलाच धडा मिळाला आहे. पालघर जिल्ह्यात 46 प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक आरोग्य केंद्रात केस पेपरला पाच रुपये आकारले जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मासवण आरोग्य केंद्रात गोरगरीब जनतेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांच्याकडून बेकायदेशीर शुल्क आकारले जात असल्याची माहिती tv9 मराठीच्यी हाती लागली होती.

ही बाब जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रुग्णांना इंजेक्शन दिल्यांनतर त्यांच्याकडून 10 रुपये घेत असल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी तेथील परिचारिकेला ते पैसे का घेतले असा जाब विचारला. डॉक्टरांच्या सांगण्यावरून हे पैसे घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तेथील कनिष्ठ डॉक्टरांनीही याची ग्वाही दिली. तर हे पैसे आपण गरीब गरजू रुग्णांच्या कल्याणासाठी घेत असून आपण रुग्ण कल्याण समितीला सांगितले असल्याचे येथील प्रभारी डॉक्टर काळे यांनी सांगितले. पण पैसे घेत असल्याचे लेखी म्हणणे किंवा त्याच्या हिशोबाचा लेखी पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले.

येथे केनळ गोरगरीब आदिवासींकडून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत बेकायदेशीर पैसे आकारले जात होते. गोरगरीब जनतेचा हक्क असलेल्या निशुल्क आरोग्य सेवेकडूनच त्यांची लूट होत हाती.

डॉक्टर काळे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या संबंधित विभागीय चौकशी करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.