महाराष्ट्रात सौर ऊर्जा पार्क उभारणार; महानिर्मितीच्या एनटीपीसी समवेत कंपनी स्थापण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

| Updated on: Apr 07, 2022 | 6:29 PM

ही संयुक्त उद्यम कंपनी राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करेल. त्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागास राज्य सुकाणू अभिकरण म्हणून घोषित करण्यात आले.

महाराष्ट्रात सौर ऊर्जा पार्क उभारणार; महानिर्मितीच्या एनटीपीसी समवेत कंपनी स्थापण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी मान्यता
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क (Ultramega Renewable Solar Power Park) उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लिमिटेडसोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. .या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) होते. राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करण्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (किंवा त्यांचे सहाय्यक/ सहयोगी कंपनी) व महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महानिर्मिती) यांच्या दरम्यान अनुक्रमे 50:50 या प्रमाणात भांडवली गुंतवणूक राहील.

ही संयुक्त उद्यम कंपनी राज्यात 2500 मेगावॅट (Megawatts) क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करेल. त्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागास राज्य सुकाणू अभिकरण (State Nodal Agency) म्हणून घोषित करण्यात आले.

अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत

या समितीवर राज्य शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत अशा बाबींचे पालन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सौर ऊर्जा पार्कमधील प्रकल्पधारकांकडून एक रकमी शुल्क व वार्षिक संचलन व देखभाल शुल्क केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार  करण्यात आले आहे.

2025 पर्यंत विकसि होणार

अपारंपरिक ऊर्जासाठी 17360 मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प 21 मार्च 2025 पर्यंत विकसित करण्यात येणार असून यापैकी 12930 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यात सध्या 9305 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून 2123 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.

संबंधित बातम्या

Chandrakant Patil Banner : कोथरुडच्या रस्त्यावर चंद्रकांत पाटील हरवल्याचे बॅनर, कुठे आहेत दादा?

Ratnagiri : जयगडच्या समुद्रात डॉल्फिनदर्शन! मासेमाऱ्यांना रेकॉर्ड केलेला व्हिडीओ व्हायरल

Sanjay Raut: यापुढं महाराष्ट्रात 25 वर्ष भाजची सत्ता येणार नाही, भाजपने स्वत:चीच कबर खोदली; राऊतांचा इशारा