राष्ट्राध्यक्षाचा पराभव, डोनाल्ड ट्रम्प यांचा खेळ बिघडवणारा बायडन यांचा हुकमी डाव

| Updated on: Nov 08, 2020 | 12:36 AM

आपण चार वर्षांच्या कार्यकाळासह दुसऱ्यांदा सहज राष्ट्रपती होणार असा विश्वास ट्रम्प यांना होता. पण बायडन यांनी प्रचारात मांडलेल्या मुद्द्यांमुळे ट्रम्प यांचा खेळ पलटला आहे.

राष्ट्राध्यक्षाचा पराभव, डोनाल्ड ट्रम्प यांचा खेळ बिघडवणारा बायडन यांचा हुकमी डाव
Follow us on

वॉशिंग्टन : ‘विजय सोपा असतो पण पराभव मात्र कठीण असतो’ असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांनी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर केलं होतं. अगदी त्याचप्रमाणे ट्रम्प यांच्यासाठी हा पराभव अजिबात सोपा नाही. अमेरिकेच्या निवडणुकांचा (us election) निकाल आला असून यामध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. आपण चार वर्षांच्या कार्यकाळासह दुसऱ्यांदा सहज राष्ट्रपती होणार असा विश्वास ट्रम्प यांना होता. पण बायडन यांनी प्रचारात मांडलेल्या मुद्द्यांमुळे ट्रम्प यांचा खेळ पलटला आहे. (us election facts why donald trump defeat in election)

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कडवी झुंज देणारे जो बायडन या निवडणुकीत 273 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघे 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. या निकालानंतर ट्रम्प हे व्हाईट हाऊसच्या या स्पर्धेत मागे कसे राहिले हाच प्रश्न आता सगळ्यांच्या मनात आहे.

अमेरिकन जनतेचा बायडन यांच्यापेक्षा ट्रम्पवर जास्त विश्वास होता या सगळ्या जगाने पाहिलं. पण तरीदेखील ट्रम्प यांचा पराभव म्हणजे सगळ्यांसाठी धक्का होता. पण एका सर्वेक्षणानुसार, यावेळी 34 टक्के लोकांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर मतदान केलं आहे. 21 टक्के लोकांनी वर्णभेद लक्षात घेत तर 18 टक्के लोकांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मतदान केलं. यामध्ये 11-11 टक्के लोकांनी आरोग्य, गुन्हे आणि सुरक्षितता लक्षात घेत मतदान केलं आहे.

अर्थव्यवस्था आणि रोजगार
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अर्थव्यवस्था आणि रोजगाराचा आहे. ज्याला अमेरिकन जनतेनं सर्वात मोठा मुद्दा म्हणून मतदान केलं आहे. यामुळे ट्रम्प यांच्या पराभवाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अर्थव्यवस्था आणि बेरोजगारी. कोरोना विषाणूमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळली आहे. तिसऱ्यांदा तिमाहीत जीडीपीच्या 33 टक्क्यांहून अधिक विक्रमी वाढ झाली.

ट्रम्प यांनी जानेवारी 2017 मध्ये अध्यक्षपद स्वीकारलं तेव्हा बेरोजगारीचा दर 7.7 टक्के होता. या वर्षी सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.9 टक्के इतका होता.

वर्णभेदचा मुद्दा
कोरोनासोबत ट्रम्प यांच्या पराभवाचं आणखी एक कारणं म्हणजे वर्णभेद. मे 2020 मध्ये आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉइडच्या निधनानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा वर्णभेदाचा मुद्दा गंभीर झाला. यावेळी ‘Black Lives Matter’ च्या घोषणेनं लाखो लोकं रस्त्यावर उतरली होती. यावरून अमेरिकेत दंगलीही झाल्या. याचाच फटका ट्रम्प यांना निवडणुकीत पाहायला मिळाला.

इतर बातम्या – 

Kamala Harris | भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय, अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

Joe Biden | ‘जो’ जीता वही सिकंदर!; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

(us election facts why donald trump defeat in election)