वडिलांनी पेढे आणले, पण समाधानकारक गुण नसल्याने बारावीच्या मुलीची आत्महत्या

| Updated on: May 29, 2019 | 5:01 PM

वर्धा : टक्केवारीच्या मागे धावताना विद्यार्थी जिवाचाही विचार करत नाहीत. अपेक्षांपेक्षा कमी गुण मिळाल्यास टोकाची पावलं विद्यार्थी उचलतात. असाच प्रकार वर्ध्यातील अडेगाव इथे घडला. बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केली. पालक या गुणांवर समाधानी होते, पण या मुलीने समाधानकारक गुण नसल्याने जीवन संपवलं. पूजा विजय भिसे असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. देवळीच्या […]

वडिलांनी पेढे आणले, पण समाधानकारक गुण नसल्याने बारावीच्या मुलीची आत्महत्या
Follow us on

वर्धा : टक्केवारीच्या मागे धावताना विद्यार्थी जिवाचाही विचार करत नाहीत. अपेक्षांपेक्षा कमी गुण मिळाल्यास टोकाची पावलं विद्यार्थी उचलतात. असाच प्रकार वर्ध्यातील अडेगाव इथे घडला. बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केली. पालक या गुणांवर समाधानी होते, पण या मुलीने समाधानकारक गुण नसल्याने जीवन संपवलं.

पूजा विजय भिसे असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. देवळीच्या जनता कनिष्ठ महाविद्यालयात पूजा भिसे बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. बारावीचा निकाल असल्याने तिलाही उत्सुकता होती. तिने ऑनलाईन निकाल पाहिला. बारावीत पुजाला 55 टक्के गुण मिळाले. कोणतीही शिकवणी न लावता पूजाने हे यश मिळवलं. मुलीचं कौतुक करण्यासाठी वडील विजय भिसे घरी पेढे घेऊन आले. पण, सायंकाळच्या सुमारास पुजाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली आणि पुजा पास झाल्याचा आनंद दु:खात परिवर्तीत झाला. पुजाचं वर्ध्याच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करत मृतदेह परीजनाच्या सुपूर्द करण्यात आले.

पुजाच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. केवळ कमी गुण मिळाल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणं निश्चितच सर्वांच्या मनाला चटका लावणारं आणि काळजीत वाढ करणार आहे. कुणी नापास झालं, तर त्याला पुन्हा परीक्षा देता येईल. कमी गुण मिळाले तर भविष्यात कोणताही चांगला पर्याय निवडता येईल. पण जीवन संपवल्याने विद्यार्थी आणि आई-वडिलांचीही स्वप्न अपूर्ण राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून जाण्यापेक्षा पुढील पर्याय शोधणं गरजेचं आहे.