अॅडमिनसाहेब पार्टी कधी? व्हॉट्सअॅपवर सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं!

| Updated on: Sep 17, 2019 | 3:27 PM

व्हॉट्सअॅप ग्रुपवर सातत्याने विचरला जाणारा प्रश्न म्हणजे अॅडमिनसाहेब पार्टी कधी? या प्रश्नाचं उत्तर बुलडाण्यातील एका व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनने दिलं आहे.

अॅडमिनसाहेब पार्टी कधी? व्हॉट्सअॅपवर सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं!
Follow us on

बुलडाणा : आजच्या जगात व्हॉट्सअॅप (Whatsapp Group Party) हे संवादाचं महत्त्वाचं माध्यम मानलं जातं. व्हॉट्सअॅपवरुन (Whatsapp Group Party)  चॅट, विनोद, व्हिडीओ, बातम्या,मनोरंजन सर्व प्रकारचे मेसेज फॉरवर्ड केले जातात. व्हॉट्सअॅप ग्रुपवर सातत्याने विचरला जाणारा प्रश्न म्हणजे अॅडमिनसाहेब पार्टी कधी? या प्रश्नाचं उत्तर बुलडाण्यातील एका व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनने दिलं आहे.

चिखली येथील ‘फक्त 96’ या (Fakt 96 whatsapp group) व्हॉट्सअॅप ग्रुपला 6 वर्षे पूर्ण झाली, म्हणून ग्रुपचा वाढदिवस ग्रुप अॅडमिनने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. यासाठी केक तर कापलाच शिवाय ग्रुप मेम्बर्सना (Fakt 96 whatsapp group) शेतात चुलीवरच्या जेवणाची पार्टीही दिली.  या आगळ्यावेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुप पार्टीची परिसरात चर्चा आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली येथील सामाजिक क्षेत्रात नेहमीच कार्यशील असणारे प्रमोद पाटील यांनी मागील 6 वर्षांपूर्वी ”फक्त 96” या नावाने व्हॉट्सअॅपग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये जवळपास 250 सदस्य असून त्यात राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक क्षेत्र, पत्रकार , अधिकारी – कर्मचारी आदींसह सर्वच क्षेत्रातील लोक आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कामही केलं जाते. गरजूंना या ग्रुप मेंबरच्या माध्यमातून वेळोवेळी सर्वोतोपरी मदत सुद्धा केली जाते.

ग्रुपचे नाव जरी फक्त 96 असले तरी सर्वच क्षेत्रातील मेंबर्स असल्याने मदतही सर्वांना केली जाते. हा व्हॉट्सअॅपग्रुप मागील 6 वर्षांपासून सुरु आहे.

ग्रुपवर नेहमीच विचारांची देवाणघेवाण केली जाते.. या ग्रुपमधील अनेकांनी एकमेकांना कधी पाहिले नव्हते. कधी समोरासमोर संभाषण झाले नव्हते. फक्त ग्रुपवर होत असलेल्या चॅटिंगच्या माध्यमातून ओळख एव्हढेच होत असे. म्हणून फक्त 96 याचे ग्रुप अॅडमिन प्रमोद पाटील यांनी या ग्रुपचा  वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले.

यामाध्यमातून सर्वजण एकत्र जमतील आणि एकमेकांसोबत ओळखही होईल. शिवाय विविध विषयावर चर्चा होईल यासाठी सर्वांना ग्रुपमध्ये निमंत्रण पत्रिका पाठवून वाढदिवस साजरा करण्याचे निमंत्रण दिले. सर्वांसाठी चुलीवरील जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

ग्रुपला 6 वर्ष झाले म्हणून केक कापून वाढदिवस साजरा केला आणि सदस्यांना चुलीवरचे मराठमोळं जेवण दिलं. यामध्ये ज्वारीची भाकरी, उडीद डाळ, ठेचा, शिरा हे पदार्थ असल्याने सदस्यांनीही ताव मारत अॅडमिनचे अभिनंदन केले.