दोन लाख अंगणवाडी सेविकांच्या झुंजार नेत्या मंगला सराफ यांचं निधन

| Updated on: May 30, 2019 | 7:52 AM

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांच्या झुंजार नेत्या मंगला सराफ या काळाच्या पडद्याआड गेल्या. औरंगाबाद येथे काल (29 मे) सायंकाळी अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने मंगला सराफ यांचे निधन झाले. त्यांचे वय ६३ होते. मंगला सराफ यांच्या अकाली आणि दु:खद निधनाने कामगार चळवळीत हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष पदावरुन […]

दोन लाख अंगणवाडी सेविकांच्या झुंजार नेत्या मंगला सराफ यांचं निधन
Follow us on

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांच्या झुंजार नेत्या मंगला सराफ या काळाच्या पडद्याआड गेल्या. औरंगाबाद येथे काल (29 मे) सायंकाळी अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने मंगला सराफ यांचे निधन झाले. त्यांचे वय ६३ होते.

मंगला सराफ यांच्या अकाली आणि दु:खद निधनाने कामगार चळवळीत हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष पदावरुन त्यांनी सातत्याने अंगणवाडी महिलांना न्याय मिळवून दिला. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी कधी न्यायालयीन, तर कधी रस्त्यावरील लढाई त्यांनी केली. अत्यंत लढवय्या नेत्या म्हणून मंगला सराफ सर्वांना परिचित होत्या

अंगणवाडी सेविकांच्या संघटनेचे अध्यक्ष कॉ. एम. ए पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व लढयात मंगला सराफ यांनी अग्रभागी राहुन आदर्श निर्माण केले.

कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या (महाराष्ट्र राज्य) वतीने कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सहनिमंत्रक विश्वास उटगी यांनी मंगला सराफ यांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, औरंगाबाद येथे आज (30 मे) रोजी मंगला सराफ यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. अंगणवाडी सेविका संघटनेसह कामगार संघटनांचे नेते आणि सर्व पदाधिकारी यावेळी हजर असतील.