जगातील आरामदायी जॉब, रेल्वे स्टेशनवर बसा, 1.59 लाख पगार मिळवा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

स्टॉकहोम (स्वीडन) : स्वीडनमध्ये एका अशा आर्ट प्रोजेक्टवर काम होत आहे की, तिथे जगातील सर्वोत्तम जॉब ऑफर केला जाणार आहे. विशेष म्हणजे या जॉबमध्ये तुम्हाला काहीच काम नाही. एका रेल्वे स्टेशनवर फक्त लाईट लावा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कामाची वेळ संपेपर्यंत काहीही करा. तुमच्यावर काहीही बंधन नसेल. या जॉबसाठी तुम्हाला 10 किंवा 20 हजार पगार […]

जगातील आरामदायी जॉब, रेल्वे स्टेशनवर बसा, 1.59 लाख पगार मिळवा
Follow us on

स्टॉकहोम (स्वीडन) : स्वीडनमध्ये एका अशा आर्ट प्रोजेक्टवर काम होत आहे की, तिथे जगातील सर्वोत्तम जॉब ऑफर केला जाणार आहे. विशेष म्हणजे या जॉबमध्ये तुम्हाला काहीच काम नाही. एका रेल्वे स्टेशनवर फक्त लाईट लावा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कामाची वेळ संपेपर्यंत काहीही करा. तुमच्यावर काहीही बंधन नसेल. या जॉबसाठी तुम्हाला 10 किंवा 20 हजार पगार नाही तर तब्बल लाखो रुपयांत पगार दिला जाणार आहे.

इंटर्नल एम्प्लॉयमेन्ट (Eternal Employment) असं या प्रोजेक्टचं नाव आहे. 2017 मध्ये या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. पब्लिक आर्ट एजन्सी स्वीडन (Public Art Agency Sweden) आणि स्वीडिश ट्रान्सपोर्ट अॅडमिनिस्ट्रेशन (Swedish Transport Administration) या दोघांनी मिळून हा संयुक्त प्रोजेक्ट सुरु केला आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तुमच्या मर्जीने काम करण्याची सूट दिली जाणार आहे.

नेमकं काम काय?

स्वीडनमध्ये गॉटनबर्ग शहरात एक नवीन रेल्वे स्टेशन बनत आहे. कॉर्सवॅगन असं या नवीन रेल्वे स्थानकाचे नाव आहे. या स्टेशनवर जाऊन तुम्हाला लाईट ऑन करुन बसायचं आहे. विशेष म्हणजे इथे तुम्हाला काही काम नाही. स्टेशनवर लाईट ऑन करा आणि यानंतर तुमच्या मर्जीनुसार तुम्ही काहीही करु शकता. तुमच्या शिफ्टची वेळ संपल्यावर स्टेशनवरील लाईट बंद करुन घरी जा, अशा प्रकारचा हा जॉब आहे. ज्या कंपनीकडे या प्रोजेक्टवर लक्ष ठेवण्याचे काम दिलं आहे त्या कंपनीनेही इथल्या नोकरी संदर्भात म्हटलं आहे की, “कर्माचारी काही करु शकतो, इथे काही काम नाही”.

अर्ज करण्याची तारीख

या नोकरीसाठी 2025 पासून अर्ज करता येणार आहे. तर 2026 पासून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कामावर रुजू करण्यात येईल. या जॉबसाठी जगभरातून अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येथे निवड होणे म्हणजे प्रत्येक उमेदवाराला स्पर्धात्मक आव्हान असेल.

पगार आणि सुविधा

कर्मचाऱ्यांना 2,320 अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 1 लाख 59 हजार 525 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तसेच वर्षाला पगारवाढही होणार आहे. याशिवाय इतर लाभही पेन्शन वैगरे दिले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्माचाऱ्यांना आयुष्यभर पगार मिळणार आहे. जरी त्याने जॉब सोडला किंवा निवृत्त झाले तर त्यांच्या जागेवर दुसऱ्याला घेतलं जाईल. पण त्यांना पगार मिळणार. या जॉबसाठी काही खास पात्रतेची गरज नाही. जगातील कोणताही व्यक्ती येथे अर्ज करु शकतो.