जगातील सर्वाधिक 15 गरम शहरापैंकी 10 शहरं भारतात

नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्रासह इतर ठिकाणी उन्हाने कहर केला आहे. जगातील शहरांमध्ये 15 उष्ण शहरांपैकी 10 शहरं ही भारतात असल्याचं स्पष्ट झालं आहे. एल डोराडो वेदर वेबसाईटने याबाबची माहिती दिली आहे. निर्मनुष्य झालेले रस्ते, एसी वा कुलरच्या गारव्यानेही थंडावा मिळत […]

जगातील सर्वाधिक 15 गरम शहरापैंकी 10 शहरं भारतात
| Edited By: | Updated on: Jun 03, 2019 | 8:21 PM

नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्रासह इतर ठिकाणी उन्हाने कहर केला आहे. जगातील शहरांमध्ये 15 उष्ण शहरांपैकी 10 शहरं ही भारतात असल्याचं स्पष्ट झालं आहे. एल डोराडो वेदर वेबसाईटने याबाबची माहिती दिली आहे.

निर्मनुष्य झालेले रस्ते, एसी वा कुलरच्या गारव्यानेही थंडावा मिळत नसल्याचे चित्र आणि स्वतःला थंड ठेवण्यासाठी नागरिकांनी विविध शीतपेयांचा आधार, अशी स्थिती सध्या संपूर्ण भारतात पाहायला मिळत आहेत. जगातील सर्वाधिक गरम शहरांचा एक रिपोर्ट एल डोराडो वेदर वेबसाईटने तयार केला आहे. यानुसार भारतात 10 सार्वाधिक उष्ण शहर असल्याचं स्पष्ट झालं आहे. जैसलमेर, श्रीगंगानगर, चुरु, ग्वालियर, लखनऊ, बांदा, भोपाळ, अकोला, बाडमेर आणि बिकानेर ही 10 शहरं भारतातील सर्वाधिक गरम शहरं आहेत.

एल डोराडो वेदर वेबसाईटनुसार राजस्थानच्या चुरु आणि श्रीगंगानगर सर्वात गरम जागा आहे. या ठिकाणी तापमान 48.9 डिग्री सेल्सिअस आणि 48.6 डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंदवलं गेलं. यानंतर पाकिस्तानच्या जैकोबादचा नंबर येतो. इथे 48 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशचे बांदा (47.4 डिग्री) आणि हरियाणाच्या नारनौल (47.2 डिग्री) शहरातही मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे.

दरम्यान 15 पैकी शिल्लक 5 देश हे पाकिस्तानमधील आहेत. त्यामुळे जगातील सर्वाधिक तप्त शहर 15 भारत आणि पाकिस्तानमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हिमाच्छादीत प्रदेशातही  गरमी

शिमलामध्ये रविवारी सर्वाधिक तापमान 32 डिग्री सेल्सिअस होते आणि नैनीतालमध्ये 33 डिग्री सेल्सिअस होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील दोन दशकापासून पहाडी भागातही गरमी वाढत जात आहे. 1 जून रोजी उत्तराखंड आणि मसूरीमध्येही तापमान 38 डिग्री सेल्सिअसवर पोहचले होते.

येणाऱ्या काही दिवसांत परिस्थिती सुधारु शकते. कारण जम्मू आणि काश्मिर, हिमाचल प्रदेशात पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उष्मघाताची स्थिती राजस्थान आणि पाकिस्थानमधील रेतीमुळे निर्माण होत आहे. मी अपेक्षा करतो की बंगालच्या खाडी आणि उत्तर-पश्चिमवरुन येणाऱ्या वाऱ्याने गरमी कमी होईल असं हवामान विभागाचे अधिकारी मृत्युंजय मोहपात्रा यांनी म्हटलं आहे

6,167 लोकांचा मृत्यू

लोकसभेत फेब्रुवारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या तापमानामुळे उष्माघात होऊन भारतात 2010 ते 2018 दरम्यान 6 हजार 167 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2015 या वर्षात 2081 लोकांचा मृत्यू झाला होता. काही ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्याने उष्मघाताची परिस्थिती उद्भवते. तर  हिमाच्छादित प्रदेशात हेच  तापमान 30 डिग्री अधिक तापमान झाले तर त्याला गरम जागा म्हटले जाते.