Happy Birthday Yami Gautam | अभिनेत्री बनण्यासाठी शिक्षणाला ‘अलविदा’, हिमाचल ते मुंबई यामी गौतमचा रंजक प्रवास!

| Updated on: Nov 28, 2020 | 11:13 AM

यामी गौतमच्या बॉलिवूड प्रवासाला आता 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. आयुष्मान खुरानासह ‘विक्की डोनर’ या चित्रपटातून यामी गौतमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Happy Birthday Yami Gautam | अभिनेत्री बनण्यासाठी शिक्षणाला ‘अलविदा’, हिमाचल ते मुंबई यामी गौतमचा रंजक प्रवास!
Follow us on

मुंबई : ‘फेअर अँड लवली’गर्ल अर्थात बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आज (28 नोव्हेंबर) आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे. यामी गौतमच्या बॉलिवूड प्रवासाला आता 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. आयुष्मान खुरानासह ‘विक्की डोनर’ या चित्रपटातून यामी गौतमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटाच्या यशानंतर यामीने मनोरंजन विश्वात आपले हक्काचे स्थान तयार केले आहे. ‘बाला’, ‘बदलापूर’, ‘काबिल’, ‘सरकार 3’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ सारख्या चित्रपटांतून यामीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली (Yami Gautam Birthday Special).

हिमाचल प्रदेशच्या एका छोट्याशा शहरातून सुरू झालेला यामीचा प्रवास आज मुंबईत येऊन स्थावर झाला आहे. यामीच्या या प्रवास अनेक गोष्टी घडल्या. या संघर्षावर मात करून आज ती एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे. नुकतेच तिने डिजिटल विश्वात देखील पदार्पण केले आहे. तिचा ‘गिन्नी वेड्स सन्नी’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

यामी गौतमचे अनोखे किस्से :

  1. यामी गौतमला लहानपणापासून आयएएस अधिकारी बनायचे होते. पण, काळाच्या ओघात हे स्वप्न मागे पडून तिचा कल अभिनय क्षेत्राकडे वाढू लागला.
  2. यामी कायद्याचे अर्थात वकिलीचे शिक्षण घेत होती. या सगळ्यातच अभिनयाच्या वेडाने पछाडलेल्या यामीने शिक्षणला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. अभ्यासात हुशार असणाऱ्या यामीने तडक मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने बॉलिवूड विश्वात मानाचे स्थान पटकावले आहे.
  3. चित्रपट विश्वात येण्यापूर्वी यामीने अनेक मालिकांमध्ये काम होते. ‘चांद के पार चलो’, ‘ये प्यार ना होगा कम’ आणि ‘किचन चॅम्पियन’सारख्या कार्यक्रमांमध्ये यामी झळकली होती (Yami Gautam Birthday Special).
  4. ‘विक्की डोनर’ या चित्रपटातून यामीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र. हा तिचा पहिला चित्रपट नाही. कन्नड चित्रपट ‘उल्लास उत्साह’ या चित्रपटाद्वारे तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.
  5. केवळ हिंदीच नव्हे तर, तेलुगु, पंजाबी, कन्नड, मल्याळम, तमिळ या भाषांतील चित्रपटांतही यामी झळकली होती.
  6. अभिनया व्यतिरिक्त यामीला भटकंती, संगीत आणि घर सजवण्याची आवड आहे.
  7. अभिनेत्री असण्याबरोबरच यामी एक उत्तम पोल डान्सर देखील आहे (Yami Gautam Birthday Special).
  8. ‘बाला’ची ही अभिनेत्री चहा शौकीन आहे. चहाशिवाय यामीचा दिवस सुरू होत नाही. ती जेव्हाही प्रवास करते, तेव्हा सोबत चहाची छोटी किटलीसोबत ठेवते.
  9. यामी पर्यावरण प्रेमी आहे. यामीने तिच्या हिमाचलमधल्या घरी ग्रीन हाऊस आणि जैविक गार्डन तयार केले आहे.
  10. यामी गौतमचे वडील मुकेश गौतम आणि आई सुरीली गौतम पंजाबी चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. मुकेश गौतम निर्माते असून, सुरीली गौतम अभिनेत्री आहेत.

(Yami Gautam Birthday Special)