प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांची आरपीआयच्या माजी कार्यकर्त्याला बेदम मारहाण

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

बीड : भारिप नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियातून अपशब्द वापरणाऱ्या एका व्यक्तीला आंबेडकर समर्थकांनी अमानुष मारहाण केली आहे. मारहाण करून त्याची रस्त्याने धिंड काढत आंबेडकर समर्थकांनी त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात हजर केलं. घटना अंबाजोगाई येथील असून मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव महेंद्र निकाळजे आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. 3 फेब्रुवारी रोजी […]

प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांची आरपीआयच्या माजी कार्यकर्त्याला बेदम मारहाण
Follow us on

बीड : भारिप नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियातून अपशब्द वापरणाऱ्या एका व्यक्तीला आंबेडकर समर्थकांनी अमानुष मारहाण केली आहे. मारहाण करून त्याची रस्त्याने धिंड काढत आंबेडकर समर्थकांनी त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात हजर केलं. घटना अंबाजोगाई येथील असून मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव महेंद्र निकाळजे आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

3 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबईत जाहीर सभा आहे. याच सभेला समाज बांधवांना आवाहन करण्यासाठी महेंद्र निकाळजे या कार्यकर्त्याने एक सोशल मीडियात व्हिडीओ तयार केला होता. समाजाला आवाहन करण्यासोबतच भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर अपशब्द वापरले होते.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी महेंद्र निकाळजे या कार्यकर्त्याला अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेदम चोप दिला. एवढेच नाही तर या व्यक्तीची रस्त्याने धिंड काढत त्याला अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

भर रस्त्यात तब्बल अर्धा तास जमावाकडून मारहाण होत होती. मात्र त्याला वाचविण्यासाठी कोणीच धावून आले नाही. जिथे मारहाण होत होती तो परिसर गजबजलेला आहे. परंतु तिथे एकही पोलीस कर्मचारी कर्तव्यावर नव्हता. या मारहाणीत महेंद्र निकाळजे हा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेंद्र निकाळजे हा एलआयसी एजंट होता. शिवाय त्याने काही वर्षे आरपीआय गटात देखील कार्य केले आहे. सध्या तो कुठल्याही पक्षात काम करत नाही.