दिसायचंय का संतूर मम्मी, संतूर पप्पा? जाणून घेऊया अँटी-एजिंग फूडबद्दल…

| Updated on: May 03, 2023 | 1:36 PM

आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्याचा समावेश करून तुम्ही बराच काळ तरुण दिसू शकता. या पदार्थांमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेतील घट्टपणा वाढवतात, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या कमी दिसतात, तर चला जाणून घेऊया अँटी-एजिंग फूडबद्दल...

दिसायचंय का संतूर मम्मी, संतूर पप्पा? जाणून घेऊया अँटी-एजिंग फूडबद्दल...
Anti aging food
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: सुंदर आणि तरुण दिसण्याची प्रत्येकाची इच्छा दीर्घकाळापासून असते. अशातच वाढत्या वयामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषांमुळे जर तुम्हाला काळजी वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्याचा समावेश करून तुम्ही बराच काळ तरुण दिसू शकता. या पदार्थांमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेतील घट्टपणा वाढवतात, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या कमी दिसतात, तर चला जाणून घेऊया अँटी-एजिंग फूडबद्दल…

अँटी-एजिंग फूड

  1. जर तुम्हाला बराच काळ तरुण दिसायचं असेल तर आपल्या आहारात पपईचा समावेश नक्की करा. पपई खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते. याशिवाय पपईचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  2. जर तुम्हाला स्वत:ला बराच काळ तरुण दिसायचं असेल तर व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक तर कायम राहीलच. यासोबतच तुमचे केसही काळे होतात. त्यामुळे संत्री, मोसंबी, डाळिंब, सफरचंद इत्यादी रोज खावे.
  3. जर तुमच्या आयुष्यात सकारात्मक विचार असेल तर तुमचं आरोग्यही चांगलं राहतं कारण तुम्ही कोणत्याही प्रकारचा ताण घेतला तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही दिसू लागतो. यामुळे तुम्ही वयाआधीच मोठे दिसू शकता. त्यामुळे नेहमी ताण घेणे टाळावे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)