केळीच्या सालीचे पाणी केसांसाठी प्रचंड उपयोगी, वाचा!

| Updated on: Apr 30, 2023 | 4:02 PM

इतकंच नाही तर केसांमध्ये सालीचं पाणी लावल्याने केसांना चमक येते. यासोबतच केळीमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे आपल्या केसांना इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. केसांमध्ये या पाण्याचा वापर केल्याने कोंडा, चिडचिड आणि खाज सुटणे यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते, तर चला जाणून घेऊया केळीच्या सालीचे पाणी कसे बनवावे.

केळीच्या सालीचे पाणी केसांसाठी प्रचंड उपयोगी, वाचा!
r beautiful hair
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: लांब आणि सुंदर केस प्रत्येकालाच हवे असतात.आज आम्ही तुमच्यासाठी केळीच्या सालीचं पाणी घेऊन आलो आहोत. केळीमध्ये कॅटेचिनसारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे केसांच्या पेशींचे नुकसान टाळण्यास मदत करते. केसांना सालीचे पाणी लावल्याने अकाली पांढरे होणे, केस पातळ होणे, कोरडेपणा आणि दुहेरी केस टाळण्यास मदत होते. इतकंच नाही तर केसांमध्ये सालीचं पाणी लावल्याने केसांना चमक येते. यासोबतच केळीमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे आपल्या केसांना इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. केसांमध्ये या पाण्याचा वापर केल्याने कोंडा, चिडचिड आणि खाज सुटणे यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते, तर चला जाणून घेऊया केळीच्या सालीचे पाणी कसे बनवावे.

केळीच्या सालीचे पाणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य

  • केळीची साल 2
  • पाणी 3 कप

केळीच्या सालीचे पाणी कसे बनवावे?

  • केळीच्या सालीचे पाणी बनवण्यासाठी प्रथम १ कढई घ्यावी.
  • मग त्यात पाणी घालून अर्धे होईपर्यंत उकळावे.
  • यानंतर गॅस बंद करून पाणी कोमट होऊ द्यावे.
  • नंतर त्यात २ केळीची साल घालून रात्रभर भिजवून ठेवा.
  • यानंतर हे पाणी सकाळी एकदा मिसळून स्प्रे बाटलीत भरून घ्यावे.
  • आता लांब केसांसाठी केळीच्या सालीचे पाणी तयार आहे.

केळीच्या सालीचे पाणी केसांना कसे लावावे?

  • केळीच्या सालीचे पाणी तुम्ही केसांमध्ये कंडिशनर म्हणून लावू शकता.
  • हवं असेल तर केसांमध्ये स्प्रे करून थोडा वेळ सोडा.
  • यानंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवावेत.
  • मग तुम्ही केसांचे अतिरिक्त पाणी पिळून घ्या आणि तुम्ही बनवलेले सालाचे पाणी लावा.
  • यानंतर हे पाणी केसांमध्ये सुमारे 20 मिनिटे राहू द्या.
  • त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस धुवून स्वच्छ करावेत.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)