Skin Care : त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर गुणकारी, वाचा!

| Updated on: Jul 01, 2021 | 7:57 AM

अॅपल सायडर व्हिनेगर केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण जर दररोज अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आपल्या त्वचेला लावले तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

Skin Care : त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर गुणकारी, वाचा!
त्वचेच्या काळजीसाठी करा हे घरगुती उपाय
Follow us on

मुंबई : अ‍ॅपल सायडर व्हिनेगर केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण जर दररोज अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आपल्या त्वचेला लावले तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये एसिटिक अॅसिड असते जे त्वचेला एक्सफोलीएट करण्यास मदत करते. याशिवाय हे ब्लॅक हेड्स काढून टाकण्यास मदत करते. हे आपल्या त्वचेतील पीएच संतुलित करण्यास मदत करते. (Apple cider vinegar is beneficial for many skin problems)

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि बेसन पीठाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ आणि सहा चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट साधारण दहा मिनिटांसाठी फ्रीमध्ये ठेवा आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

आपल्यापैकी बर्‍याचजणांना हे माहित आहे की अ‍ॅपल व्हिनेगर त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे त्वचेतून मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला 2 चमचे अ‍ॅपल व्हिनेगर थोड्या पाण्यात मिसळावे लागेल. हे मिश्रण कापूसच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा. साधारण दहा मिनिटे तसेच ठेवा आणि पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय आपण आठवड्यातून दोन वेळा केला पाहिजे.

अ‍ॅपल साइडर व्हिनेगर आणि ओट्सचे फेसपॅक आपण घरी तयार करू शकतो. हे तयार करण्यासाठी ओट्सचे पीठ आणि अ‍ॅपल साइडर व्हिनेगर मिक्स करावे. हे चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक कोरडा होईपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर स्वच्छ थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचेला चमक येईल. हे फेसपॅक ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स काढून टाकण्यास देखील मदत करते. यामुळे त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते.

संबंधित बातम्या : 

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Apple cider vinegar is beneficial for many skin problems)