Skin Care : चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी जोजोबा तेल फायदेशीर, वाचा! 

| Updated on: Nov 19, 2021 | 1:06 PM

ज्या लोकांच्या चेहऱ्यावर मुरूमाची समस्या आहे. असे लोक शक्यतो त्वचेला तेल लावणे टाळतात. तेलामुळे मुरुम वाढतो असा सर्वसामान्य समज आहे. पण काही नैसर्गिक तेल आहेत जी तुम्हाला मुरुमापासून मुक्त होण्यास मदत करू शकतात.

Skin Care : चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी जोजोबा तेल फायदेशीर, वाचा! 
त्वचेची काळजी
Follow us on

मुंबई : ज्या लोकांच्या चेहऱ्यावर मुरूमाची समस्या आहे. असे लोक शक्यतो त्वचेला तेल लावणे टाळतात. तेलामुळे मुरुम वाढतो असा सर्वसामान्य समज आहे. पण काही नैसर्गिक तेल आहेत जी तुम्हाला मुरुमापासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. जोजोबा तेल हे अशा प्रभावी नैसर्गिक तेलांपैकी एक आहे. ज्याचा वापर मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो.

जोजोबा तेल त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी खूप चांगले काम करते. कोरड्या त्वचेपासून वृद्धत्वाच्या लक्षणांपर्यंत ते मुरुमापर्यंत त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे तेल जवळजवळ सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. त्यात व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन ई, कॉपर, झिंक, सेलेनियम, आयोडीन, क्रोमियम इ. मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी जोजोबा तेलाचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो.

जोजोबा तेल मालिश

जोजोबा तेलाचे 4-6 थेंब घ्या आणि ते शोषले जाईपर्यंत तुमच्या स्वच्छ चेहऱ्याच्या त्वचेवर मसाज करा. ते धुण्याची गरज नाही. जोजोबा तेल रात्री मॉइश्चरायझर म्हणून वापरा. झोपण्यापूर्वी तुमच्या स्वच्छ चेहऱ्यावर जोजोबा तेलाचे काही थेंब मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुवा. जोजोबा तेलाचा नियमित वापर केल्यास मुरुमाची समस्या दूर होते.

जोजोबा तेल आणि लिंबाचा रस

एक चमचा ताजा लिंबाचा रस घ्या आणि त्यात जोजोबा तेलाचे 3-4 थेंब घाला. ते मिक्स करून चेहऱ्यावर लावा. काही मिनिटांसाठी आपल्या बोटांनी त्वचेला हळूवारपणे मसाज करा. हे मिश्रण 15-20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. धुण्यासाठी साधे पाणी वापरा आणि तुम्ही ते आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा वापरू शकता.

जोजोबा तेल आणि कोरफड

कोरफड जेलमध्ये एक चमचे जोजोबा तेलाचे 3-4 थेंब मिसळा. याची पेस्ट तयार कर आणि 20 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. नैसर्गिकरित्या मुरुमापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही दर दुसऱ्या दिवशी याचा वापर करू शकता.

जोजोबा तेल आणि बेकिंग सोडा

एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात आवश्यक प्रमाणात जोजोबा तेल घाला. मिक्स करून पेस्ट बनवा. आपला चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि पेस्ट चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने दोन मिनिटे मसाज करा आणि नंतर सुमारे 5-8 मिनिटे राहू द्या. त्यानंतर  थंड पाण्याने धुवा. मुरुमावर उपचार करण्यासाठी आठवड्यातून दोन किंवा तीनदा याचा वापर केला जाऊ शकतो.

(टीप : कोणत्याही टिप्स ट्राय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या :