Skin Care : चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फेसपॅक फायदेशीर, वाचा अधिक! 

| Updated on: Nov 30, 2021 | 9:36 AM

एका विशिष्ट वयानंतर त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी हळद ही अत्यंत फायदेशीर आहे. 

Skin Care : चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी हे फेसपॅक फायदेशीर, वाचा अधिक! 
त्वचेची काळजी
Follow us on

मुंबई : एका विशिष्ट वयानंतर त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी हळद ही अत्यंत फायदेशीर आहे. मुरुमापासून ते बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी हळद मदत करते. चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी हळदपासून तयार केलेले काही फेसपॅक आपण चेहऱ्याला लावू शकता.

हळद आणि दुधाचा फेस मास्क

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी आपण दूध आणि हळदीचा फेस मास्क घरी तयार केला पाहिजे. दोन चमचे दूध आणि अर्धा चमचा हळद मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर तसेच मानेला समान रीतीने लावा. 15-20 मिनिटे राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.

हळद आणि कोरफड

एक चमचा हळद पावडर घ्या आणि त्यात कोरफड घाला. ते एकत्र मिसळा आणि हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेला लावा. ताज्या पाण्याने धुण्यापूर्वी 15-20 मिनिटे राहू द्या. हा अँटी एजिंग फेस मास्क आठवड्यातून 2-3 वेळा वापरला जाऊ शकतो.

हळद आणि मध

चिमूटभर हळद पावडर घ्या आणि त्यात थोडा मध घाला. एकत्र करून पेस्ट बनवा. ते संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ताज्या पाण्याने धुवा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

हळद आणि केळी

अर्धे पिकलेले केळे घ्या आणि केळीचा लगदा तयार करा. ते बाहेर काढा आणि त्यात चिमूटभर हळद घाला. एकत्र मिसळा आणि संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. ताज्या पाण्याने धुण्यापूर्वी 15-20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. हा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या :