Cancer | कर्करोगाच्या आजारापासून दूर ठेवतील ‘हे’ घटक, आहारातही करा समावेश…

| Updated on: Feb 04, 2021 | 12:45 PM

दरवर्षी 4 फेब्रुवारीला 'जागतिक कर्करोग दिन' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे कर्करोगाच्या आजाराबद्दल लोकांना जागरूक करणे.

Cancer | कर्करोगाच्या आजारापासून दूर ठेवतील ‘हे’ घटक, आहारातही करा समावेश...
सर्वाधिक धोकादायक रक्ताचा कर्करोग
Follow us on

मुंबई : दरवर्षी 4 फेब्रुवारीला ‘जागतिक कर्करोग दिन’ साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे कर्करोगाच्या आजाराबद्दल लोकांना जागरूक करणे. कोणतेही अन्न किंवा पेय कर्करोगाचा पूर्णपणे प्रतिबंध करू शकत नाही, परंतु काही पदार्थांमध्ये कर्करोगविरोधी घटक असतात आणि ते खाल्ल्याने कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. चला तर या पदार्थांद्दल जाणून घेऊया…( Healthy Food will reduce chances of Cancer)

रंगीत फळे आणि भाज्या

कॅन्सरशी लढा देण्यासाठी रंगीत फळे आणि भाज्या खूप फायदेशीर मानल्या जातात. या रंगीबेरंगी भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये पुष्कळ प्रकारचे पोषक घटक आढळतात. फळे आणि भाज्या सर्व प्रकारच्या कर्करोगाची संभावी शक्यता कमी करतात. आपल्या आहारात गडद लाल, हिरव्या आणि केशरी रंगाच्या भाज्या समाविष्ट कराव्यात.

फोलेटयुक्त घटक

फोलेट हा एक महत्त्वपूर्ण जीवनसत्व बी असणारा घटक आहे जो कोलोन, रेटल आणि स्तनाच्या कर्करोगापासून आपला बचाव करतो. आपल्या नाश्त्यात जास्तीत जास्त फोलेटयुक्त पदार्थ समाविष्ट करा. फोलेटचे प्रमाण वाढवण्यासाठी संत्र्याचा रस, खरबूज आणि स्ट्रॉबेरी खा. याशिवाय अंडी, सोयाबीन, सूर्यफूल बियाणे आणि पालक देखील फोलेटचे चांगले स्रोत आहेत.

ग्रीन टी

कर्करोगाशी लढण्यासाठी ग्रीन टी खूप उपयुक्त मानली जाते. अभ्यासात असे आढळले आहे की ग्रीन टी कोलन, यकृत, स्तन आणि पुर:स्थ पेशींच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करतो. फुफ्फुसाच्या ऊती आणि त्वचेवरही याचा चांगला परिणाम होतो. ग्रीन टी मूत्राशय, पोट आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका देखील कमी करते (Healthy Food will reduce chances of Cancer).

द्राक्ष

द्राक्ष आणि त्याच्या रसात रेसवेराट्रॉल नावाचे एक कंपाऊंड असते. रेसवेराट्रॉलमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट आणि विरोधी दाहक गुणधर्म आहेत. रेझव्हेराट्रोल पेशी कर्करोगामुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचा बचाव करतात.

पाणी आणि इतर द्रव पदार्थ

पाणी केवळ तहानच भागवते असे नाही, परंतु यामुळे मूत्राशयाच्या कर्करोगापासूनही आपला बचाव होतो. आहारात द्रवपदार्थाचे प्रमाण वाढल्याने मूत्र जास्त होते आणि यामुळे मूत्राशय नेहमीच स्वच्छ असतो, यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.

राजमा

राजमामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत. त्यामध्ये पुष्कळ फायदेशीर रसायनिक पदार्थ आहेत, जे त्या पेशींना कर्करोगामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करतात. अभ्यासानुसार, राजमामध्ये आढळणारे पोषक घटक मुत्रापिंडातील ट्यूमर वाढण्यास प्रतिबंध करतात.

कोबी

ब्रोकोली, लाल कोबी आणि कोबी सर्व प्रकारचे कोबी अतिशय गुणकारी आहेत. या कोबीमध्ये अशी पोषक तत्त्वे आढळतात जे शरीराला सर्व प्रकारच्या कर्करोगापासून वाचवतात. आपण त्यांना हलके उकडून किंवा सलाड म्हणून आहारात सामील करू शकता.

(Healthy Food will reduce chances of Cancer)

हेही वाचा :