हिवाळ्याच्या हंगामातही निरोगी आणि हेल्दी जीवन जगायचे आहे? मग आपल्या आहारामध्ये ‘हे’ बदल नक्की करा!

| Updated on: Dec 01, 2021 | 6:30 AM

हिवाळ्याच्या हंगामाला आता सुरूवात झाली आहे. या हंगामामध्ये ताजी फळे आणि भाज्या बाजारामध्ये मिळतात. विशेष म्हणजे या हंगामामध्ये खाल्ले जाणारे सर्व पदार्थ व्यवस्थित पचतात. हिवाळा म्हणजे भटकंती आणि खाणे. ब्रेड, ऑम्लेट बरोबर नाश्ता करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.

हिवाळ्याच्या हंगामातही निरोगी आणि हेल्दी जीवन जगायचे आहे? मग आपल्या आहारामध्ये हे बदल नक्की करा!
आरोग्य
Follow us on

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामाला आता सुरूवात झाली आहे. या हंगामामध्ये ताजी फळे आणि भाज्या बाजारामध्ये मिळतात. विशेष म्हणजे या हंगामामध्ये खाल्ले जाणारे सर्व पदार्थ व्यवस्थित पचतात. हिवाळा म्हणजे भटकंती आणि खाणे. ब्रेड, ऑम्लेट बरोबर नाश्ता करण्याची ही चांगली वेळ आहे. मात्र, या हिवाळ्याच्या हंगामात कॉफीपेक्षा चहाचे जास्त सेवन केले जाते.

हिवाळ्याच्या हंगामात मात्र पाणी जास्त पिले जात नाही. हिवाळ्यात सगळेच पाणी कमी पितात. थंडीमुळे अनेकांना गरम पाणी प्यायला आवडते. हवामानामुळे शरीर कोरडे होते. यामुळे पचन समस्या, गॅस, छातीत जळजळ समस्या वाढतात. बद्धकोष्ठतेचा त्रासही होतो. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते.

हिवाळ्यात फायबर कमी खाल्ले जाते. सकाळी थंडगार वातावरण म्हटंले की, व्यायाम करण्यासाठी कोणालाही बाहेर जाऊ वाटत नाही. यामुळे वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. या हंगामात खाणे-पिणे मजेदार असते, परंतु शरीराची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. नियमानुसार, सकाळी उठून एक ग्लास गरम पाणी प्या, भरपूर फळे खा, अन्नाच्या यादीत जास्त फायबरचा समावेश करा.

भाज्या तसेच मांस समान प्रमाणात खा. तसेच, तीन हिवाळ्यातील फळांची यादी करण्याचे सुनिश्चित करा. संत्र्यामध्ये ग्रॅम फायबर असते. या संत्र्यापासून दररोज 13% फायबर मिळतात. संत्र्याचा रस खाण्यापेक्षा चघळणे चांगले. दुपारच्या जेवणानंतर खा. फळांच्या सॅलडमध्ये संत्री देखील घाला. याशिवाय आहारामध्ये जास्तीत-जास्त पदार्थांचा समावेश करा.

संबंधित बातम्या : 

Health Tips | मधुमेहाच्या रुग्णांनी रोज प्यावा ‘या’ 5 प्रकारचा चहा, रक्तातील साखर राहील नियंत्रणात!

डोळ्यांखालील डार्क सर्कल्सनी त्रस्त आहात, ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करून पाहा