Health Care | ही खास पेय पिऊन दिवसाची सुरुवात करा आणि निरोगी राहा, वाचा महत्वाची माहिती!

| Updated on: Apr 30, 2022 | 11:46 AM

गरम हवामानात जास्त पाणी प्यावे लागते. डिहायड्रेशनची समस्या यावेळी सर्वात सामान्य आहे. जेव्हा शरीरातून पाणी सुकते तेव्हा अनेक समस्या उद्भवतात. पचन समस्या, कोणत्याही संसर्गजन्य समस्या. तसेच उष्णतेच्या दिवसात अनेक बॅक्टेरिया सक्रिय असतात. म्हणून तुमच्या दिवसाची सुरूवात काही खास पेयांनी करायला हवी.

Health Care | ही खास पेय पिऊन दिवसाची सुरुवात करा आणि निरोगी राहा, वाचा महत्वाची माहिती!
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : उन्हामुळे (Summer) आणि घामामुळे सर्वांची अवस्था दयनीय झाली आहे. गरम वातावरणात घसा खवखवणे आणि डांग्या खोकल्याचा त्रास अनेकांना होत आहे. उष्ण हवामानात घशाचा संसर्ग (Infection) झाल्यास ते खूपच त्रासदायक आहे. यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. जर आपण या हंगामामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर अनेक समस्यांना (Problem) आपल्याला सामोरे जाण्याची वेळ येते. बरेच लोक या हंगामामध्ये घसा दुखीकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. मात्र, असे न करता आपण घरगुती उपचार योग्य वेळी घेत घसा दुखीची समस्या कायमची दूर करायला हवी.

डिहायड्रेशन टाळणे अत्यंत महत्वाचे

गरम हवामानात जास्त पाणी प्यावे लागते. डिहायड्रेशनची समस्या यावेळी सर्वात सामान्य आहे. जेव्हा शरीरातून पाणी सुकते तेव्हा अनेक समस्या उद्भवतात. पचन समस्या, कोणत्याही संसर्गजन्य समस्या. तसेच उष्णतेच्या दिवसात अनेक बॅक्टेरिया सक्रिय असतात. म्हणून तुमच्या दिवसाची सुरूवात काही खास पेयांनी करायला हवी. थोडे आले, हिंग, जिरे टाकून आपण खास पेय घरी तयार करायला हवे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच आपण आले, कच्ची हळद आणि काळी मिरी घालून चहा बनवू शकता.

आल्याचा आहारामध्ये समावेश करा

हा आल्याचा चहा आपण उन्हाळ्याच्या हंगामामध्ये घेतल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आले शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच जंतुसंसर्गाचा प्रादुर्भाव कमी करतो. जर या हंगामामध्ये आपण आल्याचा चहा पिणे टाळत असाल तर आपण आहारामध्ये जास्तीत-जास्त आल्याचा समावेश करावा. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते. दररोज सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये आले मिक्स करून त्या पाण्याला गरम करा आणि त्या पाण्याचे सेवन करा.