Lakshadweep trip : लक्षद्वीपला जाण्याचा प्लान करताय तर हे या 5 पदार्थ नक्की ट्राय करा

| Updated on: Feb 16, 2024 | 7:48 PM

Lakshadweep Tour : लक्षद्वीप आता भारतीयांसाठी पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचं केंद्र बनले आहे. लक्षद्वीपला भेट देण्याचं पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानंतर आता देशातील लोकं लक्षद्वीपला जाण्याचा प्लान करत आहेत. लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर नक्की येथील स्थानिक पदार्थांचा स्वाद घेतला पाहिजे.

Lakshadweep trip : लक्षद्वीपला जाण्याचा प्लान करताय तर हे या 5 पदार्थ नक्की ट्राय करा
Follow us on

Lakshadweep trip : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे. सोशल मीडियावर #चलो लक्षद्वीप ट्रेंड होत आहे. लोकं येथील पर्यटन स्थळांचा शोध घेत आहेत. लक्षद्वीप ट्रेंड होत आहे. आता लोकांनी मालदीव ऐवजी मालदीवला जाण्याचा प्लान केला आहे. आपल्याच देशातील या सुंदर ठिकाणी तुम्ही देखील नक्की भेट द्या. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विमान कंपन्यांनी देखील तयारी केली आहे. एअरलाइन्स स्पाईसजेटने लक्षद्वीपसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणाही केली आहे. तुम्ही जर लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही खाण्याचे शौकीन असाल, तर तुम्हाला आम्ही पाच पदार्थ सांगणार आहोत जे तुम्ही नक्कीच ट्राय केले पाहिजेत. पर्यटनाच्या दृष्टीने देखील भारत सरकारने हे स्थळ विकसित करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे.

लक्षद्वीपचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ

कावरत्ती बिर्याणी

चवदार आणि सुगंधी तांदूळ पासून तयार करण्यात आलेली कावरत्ती बिर्याणी ही लक्षद्वीप द्वीपसमूहाची खासियत आहे. ही डिश मसालेदार सुगंधी बासमती तांदळापासून तयार केली जाते. बिर्याणीला खोबरे, धणे आणि केशर यांचे मिश्रण अधिक स्वादिष्ट बनवते.

टुना करी

तुम्ही लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टूना करी नक्की ट्राय केला. यामध्ये भारतीय मसाले वापरले जातात. या डिशमध्ये नारळाचे दूध देखील वापरले जाते.

शिंपल्यांचे लोणचे

सीफूड हे लक्षद्वीप आणि भारतातील स्थानिक पाककृतीचे वैशिष्ट्य आहे. शिंपल्यांचे लोणचे देखील तुम्ही नक्की टेस्ट केले पाहिजे.

नारळाच्या दुधावर आधारित डिश

लक्षद्वीपमध्ये नारळाच्या दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात. जे तुम्ही नक्की ट्राय करु शकतात. नारळाच्या दुधाचे आइस्क्रीम आणि नारळाच्या दुधाच्या मिष्टान्न जसे की नारळाचे कस्टर्ड किंवा नारळ आइस्क्रीम यांचा समावेश आहे.

मोपला डिश

बिर्याणी, पाथिरी आणि मटण करी यांसारखे मोपला पदार्थ त्यांच्या अविश्वसनीय चवीने मोहित करतात, कारण हे पदार्थ मसाले आणि सुगंधी वनस्पतींनी समृद्ध आहेत.

याशिवाय कल्लुमकाया करी, केळी चिप्स, किन्नथप्पम, लॉबस्टर डिश, स्क्विड फ्राय, जॅकफ्रूट बेस्ड डिश, अडुक्कू पाथिरी, बोंडी आणि कुडुक्का हे पदार्थ देखील देखील नक्की तुम्ही ट्राय करु शकता.