पृथ्वीवर अवतरणार चंद्र; दुबईत होणार लँडिंग…

| Updated on: Sep 17, 2022 | 10:07 PM

आता दुबई शहरात पर्यटकांना थेट चंद्राची सैर करण्याची संधी मिळणार आहे. दुबई शहरातील ही नवं टूरीस्ट डेस्टिनेशन ठरणार आहे.

पृथ्वीवर अवतरणार चंद्र; दुबईत होणार लँडिंग...
Follow us on

मुंबई : प्रेमाच्या आणाभाका घेताना मी तुझ्यासाठी चंद्र, तारे तोडून आणेन असे कल्पनांचे मनोरे प्रेमवीर रचत असतात. हे सर्व कविता आणि चोरोळ्यांमध्ये ठीक वाटतं अस म्हणत प्रेमवीरांची खिल्ली देखील उडवली जाते. मात्र, प्रेमवीरांची ही कल्पना प्रत्यक्षात साकारणार आहे. ताऱ्यांचे माहित नाही पण चंद्र मात्र, प्रत्यक्षात पृथ्वीवर अवतरणार आहे. दुबईत या चंद्राचे लँडिंग होणार आहे. हा चंद्र म्हणजे दुबईतील(Dubai) ‘मून रिसॉर्ट’(Moon resort ) आहे.

दुबई हे जगभरातील पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन आहे. उत्तुंग इमारती, साहसी ठिकाणं तसेच लक्जरीयस लाईफ स्टाईल यासाठी दुबई जग प्रसिद्ध आहे.

दुबई म्हंटल की डोळ्यासमोर येते ती जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज अल-खलिफा. वाळवंटात उभारण्यात आलेल्या या इमारतीची उंची पाहून लोक थक्क होतात.

आता दुबई शहरात पर्यटकांना थेट चंद्राची सैर करण्याची संधी मिळणार आहे. दुबई शहरातील हे नवं टूरीस्ट डेस्टिनेशन ठरणार आहे. मून रिसॉर्ट असं याच नाव असणार आहे.

हा चंद्राच्या आकाराचा रिसॉर्ट असणार आहे. या रिसॉर्टचे डिझाईन कंपनी मून वर्ल्ड रिजोर्ट इंक ही कॅनेडियन कंपनी तयार करणार आहे.
या चंद्राचा आकाराच्या मून रिसर्ट 735 फूट इतका भव्य असणार आहे.

हा मून रिसॉर्ट बनवण्यासाठी पाच अब्ज डॉलर्सचा खर्च येणार आहे. भारतीय चलनानुसार हा खर्च 40 हजार कोटी इतका असणार आहे.  48 महिने महिने म्हणजेच येत्या 4 वर्षांत याचे काम पूर्ण होणार असून पर्यटकांना या मून रिसॉर्टची सैर करता येणार आहे.

मून रिसॉर्टची वैशिष्ट्ये

  1. मून इन दुबई अशी या रिसॉर्टची थीम आहे.
  2. दहा एकरमध्ये हा रिसॉर्ट बांधला जाणार आहे.
  3. यामध्ये एक वेलनेस सेंटर, नाईट क्लब असणार आहे.
  4. 300 प्रायव्हेट स्काय व्हिला आणि हॉटेल रूम असणार आहेत.

दुबई मॉल आणि अटलांटिस पाम जुमारेहसह दुबईमध्ये आधीच अनेक लक्झरी आणि पर्यटन स्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. आता या लक्झरी हॉटेल्स आणि मॉल्सच्या यादीत मून रिसॉर्टची भर पडणार आहे.