Varanasi | वाराणसीच्या ‘तुळशी घाटात’ स्नान केल्याने पूर्ण होतील मनोकामना!

| Updated on: Dec 08, 2020 | 3:26 PM

प्राचीन काळापासून वाराणसीला (Varanasi) देवांची भूमी म्हटले जाते. या शहराचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे.

Varanasi | वाराणसीच्या ‘तुळशी घाटात’ स्नान केल्याने पूर्ण होतील मनोकामना!
Follow us on

मुंबई : प्राचीन काळापासून वाराणसीला (Varanasi) देवांची भूमी म्हटले जाते. या शहराचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे. येथे बरीच देव-देवतांची मंदिरे आहेत. वाराणसी व्यतिरिक्त या शहराला बनारस आणि काशी असेही संबोधले जाते. हे शहर गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे. वाराणसीतील अनेक घाट पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते. या घाटांवर रोज नियमित पूजा आणि आरती होते. यातील अशाच एका पवित्र घाटाचे नाव आहे तुळशी घाट (Tulsi Ghat). कालांतराने या तुळशी घाटाला ‘लोल्लार्क घाट’ असे नाव पडले (People must visit Varanasi Tulsi Ghat once in a life).

वाराणसीच्या या तुळशी घाटावर भगवान सूर्याचे मंदिर आहे. जो व्यक्ती या घाटावर एकदा स्नान करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. विशेषत: ज्या स्त्रियांना मूल होत नाही, त्यांनी इथे स्नान केल्याने त्यांना इच्छित फळ मिळते, असे म्हटले जाते. संत कवी तुलसीदास यांच्या नावावरून या घाटाला ‘तुळशी घाट’ असे नाव देण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यात या घाटावर भव्य मेळा भरवला जातो. ‘कृष्णा लीला’ हे या जत्रेतील मुख्य आकर्षण असते.

याच घाटावर रचले रामचरितमानस…

या मेळ्यातील ही कृष्णा लीला बराच काळ सुरू असते आणि कार्तिक महिन्यात संपते. असे म्हणतात की, कृष्ण लीलेच्या नाटकाच्या व्यासंगाची सुरुवात संततुलशीदास यांच्यापासून झाली होती. या घाटाशी संत तुलशीदास यांचा घनिष्ट संबंध आहे. या घाटावर तुलशीदास यांनी हनुमान मंदिर बांधले. या घाटाविषयी एक पौराणिक कथा देखील आहे. या कथेनुसार, संत तुलसीदास यांनी याच घाटावर बसून अवधी भाषेत रामचरितमानस रचले.

असे म्हटले जाते की, जेव्हा तुळशीदास रामचरितमानस लिहित होते, तेव्हा रामचरितमानस त्यांच्या हातातून निसटले आणि गंगा नदीत पडले. परंतु, नदीत पडूनही रामचरितमानस ना पाण्यात विसर्जित झाले, ना ओले झाले. याउलट ते नदीच्या पृष्ठभागावर तरंगत राहिले. मग तुलसीदास यांनी गंगा नदीत उतरून ते रामचरितमानस पुन्हा मिळवले (People must visit Varanasi Tulsi Ghat once in a life).

राम मंदिराची स्थापन…

याच घाटावर सर्वात पहिल्यांदा रामलीला आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर या घाटावर भगवान राम यांचे मंदिरही स्थापन करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी तुळशी घाटावर रामलीला नाट्याचे आयोजन होते. याच घाटावर संत कवी तुलसीदास पंचतत्त्वात विलीन झाले, असेही म्हटले जाते. त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आजही या घाटावर सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये हनुमानाचा पुतळा, लाकडी खांब व उशा अशा गोष्टींचा समावेश आहे.

दरवर्षी मोठ्या संख्येने लोक या घाटावर येऊन स्नान करतात. विशेषतः कार्तिक महिन्यात या घाटावर येणाऱ्या भाविकांची संख्या वाढते. याच महिन्यात देव दिवाळीही साजरी केली जाते. याशिवाय भगवान श्रीकृष्णाचे लीलांचे देखील आयोजन केले जाते.

(People must visit Varanasi Tulsi Ghat once in a life)