हे ड्रिंक्स प्यायल्याने त्वचा होईल चमकदार!

| Updated on: May 05, 2023 | 4:56 PM

होय, सुंदर दिसण्यासाठी तुम्ही आतून हेल्दी असाल तर तुमची त्वचा चमकते. तर आज आम्ही तुम्हाला अशाच ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत जे तुमचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतील. चला तर मग जाणून घेऊयात अशी कोणती ड्रिंक्स आहेत जी तुम्हाला सुंदर आणि तरुण बनवण्याचे काम करतात.

हे ड्रिंक्स प्यायल्याने त्वचा होईल चमकदार!
Summer drinks
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: आजच्या काळात सुंदर दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण तुम्हाला माहित आहे का की त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अन्न महत्वाची भूमिका बजावते. होय, सुंदर दिसण्यासाठी तुम्ही आतून हेल्दी असाल तर तुमची त्वचा चमकते. तर आज आम्ही तुम्हाला अशाच ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत जे तुमचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतील. चला तर मग जाणून घेऊयात अशी कोणती ड्रिंक्स आहेत जी तुम्हाला सुंदर आणि तरुण बनवण्याचे काम करतात.

हे ड्रिंक्स प्यायल्याने त्वचा होईल चमकदार

सब्जा बियाणे पाणी

सब्जा बियाण्यांमध्ये कोलेजन वाढवणारे घटक असतात जे त्वचा सुधारण्यासाठी आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यासाठी कार्य करतात. त्यामुळे याचे पाणी रोज प्यावे. त्याचे सेवन करण्यासाठी एक चमचा सब्जा बियाणे १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे, आता ते पाण्यात विरघळवून त्याचे सेवन करावे. यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होईल आणि तुम्ही सुंदर दिसाल.

शेवग्याच्या पानांचं पाणी

शेवग्याच्या पानामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. जे त्वचेसाठी आरोग्यदायी आहे. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने त्वचा चमकदार होते. सैल त्वचाही घट्ट होते.ते पिण्यामुळे तुमचा चेहरा चमकदार होतो. हे पाणी पिण्यासाठी पाण्यात शेवग्याच्या पानांची पावडर मिसळून त्याचे सेवन करावे.

फ्लॅक्स सीड्स पाणी

या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स समृद्ध असतात जे जळजळ कमी करण्याचे काम करतात. ज्यामुळे ते त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात. याचे सेवन करण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचा भाजलेले फ्लॅक्स सीड्सचे दाणे मिसळून प्यावे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)