काळे डाग दूर करण्यासाठी वापरा हे तेल, सोपा घरगुती उपाय!

| Updated on: May 03, 2023 | 11:53 AM

तुमच्या त्वचेला सखोल पोषण मिळते, ज्यामुळे तुम्हाला चमकदार त्वचा मिळण्यास मदत होते. इतकंच नाही तर यामुळे तुमच्या त्वचेचा पोतही सुधारतो, तर चला जाणून घेऊया त्वचेची काळजी घेण्यासाठी या तेलाचा समावेश केल्याने होणारे फायदे.

काळे डाग दूर करण्यासाठी वापरा हे तेल, सोपा घरगुती उपाय!
Skin care routine
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: बरेच लोक त्वचेच्या मॉइश्चरायझेशनसाठी तेल वापरतात. आजच्या काळात फेस सीरम आणि आवश्यक तेल म्हणूनही अनेक तेलांचा वापर केला जातो. अशातच आज आम्ही तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेलाचे फायदे सांगणार आहोत. जर तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करत असाल तर यामुळे तुमच्या त्वचेवरील डाग कमी होतात. त्याचबरोबर तुमच्या त्वचेला सखोल पोषण मिळते, ज्यामुळे तुम्हाला चमकदार त्वचा मिळण्यास मदत होते. इतकंच नाही तर यामुळे तुमच्या त्वचेचा पोतही सुधारतो, तर चला जाणून घेऊया त्वचेची काळजी घेण्यासाठी नारळ तेलाचा समावेश केल्याने होणारे फायदे.

काळे डाग दूर करण्यासाठी नारळ तेल

  • खोबरेल तेलात लॉरिक ॲसिड असते जे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमांचे बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते.
  • खोबरेल तेल एक उत्तम मॉइश्चरायझरसारखे काम करते. त्यामुळे तुमची त्वचा ओलसर राहते.
  • खोबरेल तेल कोरड्या किंवा संवेदनशील त्वचेला हानी पोहोचवत नाही.
  • नारळ तेलात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म समृद्ध आहेत जे आपल्याला फ्री रॅडिकल्सपासून वाचविण्यात मदत करतात.
  • खोबरेल तेल तुमच्या चेहऱ्याची टॅनिंग चांगल्या प्रकारे काढून टाकते.

‘या’ समस्यांमध्ये खोबरेल तेलाचा वापर करू नका

  • हे लक्षात ठेवा की जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेलाचा समावेश करू नये.
  • चेहऱ्यावर सनस्क्रीन ऐवजी खोबरेल तेलाचा वापर करायचा नाही.
  • चेहऱ्यावर फोड आणि पिंपल्सचा त्रास होत असेल तर खोबरेल तेलाचा वापर करू नका.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)