केस लांब हवेत? दह्यात मिसळून लावा ‘या’ गोष्टी

| Updated on: May 03, 2023 | 3:24 PM

होय, दही आपल्या केसांसह आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पण जर तुम्हाला तुमचे केस कंबरेपर्यंत लांब करायचे असतील तर दह्यात काही गोष्टी मिसळाव्यात.

केस लांब हवेत? दह्यात मिसळून लावा या गोष्टी
long hair care
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: जर तुमचे केस वाढत नसतील आणि तुम्हाला तुमचे केस वेगाने वाढवायचे असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, पण अशा वेळी तुम्ही दह्याचा वापर करावा. होय, दही आपल्या केसांसह आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पण जर तुम्हाला तुमचे केस कंबरेपर्यंत लांब करायचे असतील तर दह्यात काही गोष्टी मिसळाव्यात.

केस लांब करण्यासाठी दह्यात मिसळून लावा ‘या’ गोष्टी

लिंबू

दह्यामध्ये लिंबू मिसळता येते. ते लावण्यासाठी एक वाटी दही घ्या आणि त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला. त्यानंतर आता त्यात ६ थेंब खोबरेल तेल घालावे. आता ते टाळूवर लावा. आता 6 मिनिटांनी केस धुवून टाका. असे केल्याने केस लवकर वाढतील आणि केस मजबूत होतील.

अंडी

अंडी आणि दही लावण्यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये दही घ्या आणि त्यात एक अंडी घाला आणि आता ते फेटून केसांना लावा. 20 मिनिटे केसांमध्ये ठेवा. यानंतर केस धुवून घ्यावेत. यामुळे केस आतून निरोगी होतात आणि केस वेगाने लांब होतात.

केळी आणि ऑलिव्ह ऑईल

वाटीत एक पिकलेलं केळी घाला आणि त्यात २ थेंब ऑलिव्ह ऑईल घाला. आता ते केसांना लावा. ते लावल्याने केसांची चमकही वाढते.

मध आणि व्हिनेगर

एक वाटी दही घ्या आणि त्यात एक चमचा मध आणि एक चमचा व्हिनेगर घाला. हे केसांना लावा आणि 20 मिनिटे शॅम्पूने केस धुवा. असे केल्याने केसगळती थांबते आणि केस वेगाने वाढतात.