Ganpati Festival 2022: बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु असताना झाला मृत्यू; ठाण्यात घडली भयानक घटना

| Updated on: Aug 10, 2022 | 9:08 PM

शनिवारी सकाळी हे दोघ बाप लेक गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर देण्यासाठी जात होते. अदिती स्कूटर चालवत होती आणि तिचे वडील मागे बसले होते. भिवंडी वाडा रस्त्यावरील नदी नाका पुलावर खड्ड्यांमुळे तिने ब्रेक लावला. खड्डा चुकवण्याच्या नादात तिची स्कुटी स्लीप झाली. यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या धडकेत तिचे वडिल ट्रकखाली चिरडले गेले.

Ganpati Festival 2022: बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु असताना झाला मृत्यू; ठाण्यात घडली भयानक घटना
Image Credit source: social
Follow us on

ठाणे : सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाचे(ganpati festival 2022) वेध लागले आहे. अशातच ठाण्यात एक भयानक घटना घडली आहे. गणपतीची मूर्ती बुक करण्यासाठी निघालेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला आहे. दुचाकी खड्ड्यात पडून अपघात( Thane  accident) झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुलगी या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. आनंदाचे क्षण दुख:त बदलल्याने या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. अशोक कबाडी (वय 65 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांची मुलगी अदिती ( वय 25 वर्षे) या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खड्ड्यांमुळे हा अपघात झाला आहे. माझ्या वडिलांचा मृत्यूला रस्त्यावरील खड्डेच जबाबदार झाल्याचा आरोप अदितीने केला आहे.

गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर देण्यासाठी जात असताना झाला अपघात

शनिवारी सकाळी हे दोघ बाप लेक गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर देण्यासाठी जात होते. अदिती स्कूटर चालवत होती आणि तिचे वडील मागे बसले होते. भिवंडी वाडा रस्त्यावरील नदी नाका पुलावर खड्ड्यांमुळे तिने ब्रेक लावला. खड्डा चुकवण्याच्या नादात तिची स्कुटी स्लीप झाली. यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या धडकेत तिचे वडिल ट्रकखाली चिरडले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अदितीला देखील गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ट्रक चालकाला अटक

अपघात स्थळी उपस्थित असलेल्यानी ट्रक चालक दिनकर पाकळे (50) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या ट्रक ड्राहयव्हर विरोधात निजामपुरा पोलिसांनी आयपीसी कलमांखाली रॅश ड्रायव्हिंग आणि निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल अटक केली आहे.
कबाडी हे एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले होते. त्यांची मुलगी अदिती, 25, ही व्यवसायाने शिक्षिका आहे, हिअशोक यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा अनिल असा परिवार आहे.

ठाणे जिल्ह्यात खड्ड्याने घेतला सहावा बळी

खडड्यांमुळे ठाण्यामध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील एक ते दोन महिन्यात खड्डय़ामुळे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. खडड्यांमुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आता तरी खड्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी अदितीने केली आहे.