Maharashtra Rain: विदर्भात यलो अलर्ट! भंडाऱ्यात धो-धो पाऊस; 18 ते 20 जुलै पर्यंत सर्व शाळांना सुट्टी जाहीर

| Updated on: Jul 18, 2022 | 3:56 PM

भंडारा: महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. अशातच विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील भंडारा(Bhandara) जिल्ह्यात धो धो पाऊस पडत आहे. यामुळे येथील नदी नाले ओसंडून वाहत असून भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना घरा बाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. अशा स्थितीत दुर्घटना तसेच अपघात टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भंडारा […]

Maharashtra Rain: विदर्भात यलो अलर्ट! भंडाऱ्यात धो-धो पाऊस; 18 ते 20 जुलै पर्यंत सर्व शाळांना सुट्टी जाहीर
Follow us on

भंडारा: महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. अशातच विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील भंडारा(Bhandara) जिल्ह्यात धो धो पाऊस पडत आहे. यामुळे येथील नदी नाले ओसंडून वाहत असून भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना घरा बाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. अशा स्थितीत दुर्घटना तसेच अपघात टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळांना 18 ते 20 जुलै पर्यंत सुट्टीचे( holiday) आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व शाळांना तशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत.

भंडारा जिल्ह्यात सतत होणारी अतिवृष्टी यामुळे येथील परिस्थिती गंभीर बनली आहे. हवामान खात्याकडून भंडारा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट बजावण्यात आला आहे. यामुळे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी 18 ते 20 जुलै पर्यंत सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश त्यांनी एका परिपत्रकाद्वारे जारी केले आहेत.

विदर्भात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भातील बहुतांश भागात येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. गडचिरोलीत ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यंत्रणेला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने भंडाऱ्यासगह नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलाय, तर गडचीरोली जिल्ह्यात ॲारेंज अलर्ट आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत विदर्भातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागपूर हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. त्यानंतर पुढील पाच दिवस विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे.

वाशिम जिल्ह्यात पावसाचा कहर; घराची भिंत कोसळून चिमुकला ठार

वाशिम जिल्ह्यात (Washim) सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कारंजा तालुक्यातील जांब (Jamb Taluka Karnja)येथे घराची भिंत कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू (Baby Death) झाल्याची धक्कादायक दुर्घटना आज घडली. या दुर्घटनेत समर जानीवाले (वय 1 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सेमो जानीवाले वय 65, वर्ष उमेरा जानीवाले (वय 10) युसुफ जानीवाले (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहेत.

वर्ध्यात पावसाचा कहर, 42 गावांचा संपर्क तुटला

संपूर्ण वर्धा जिल्ह्याला रविवार रात्रीपासून पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील तब्बल 42 गावांचा संपर्क तुटलेला आहे. हिंगणघाट तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक घरं पाण्याखाली आली आहेत. शेतीचंही बरंच नुकसान झालं आहे. राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 104 नागरिकांनी जीव गमावला. तसंच यंदाच्या पावसाळ्यात विविध दुर्घटनांमुळे 189 प्राणी दगावले आहेत. ठिकठिकाणी 73 तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात आलं असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे.