Amphan cyclone | अम्फान चक्रीवादळाचा चार दिवस प्रभाव, मान्सून महाराष्ट्रात वेळेवरच येणार : हवामान तज्ज्ञ

| Updated on: May 18, 2020 | 2:41 PM

पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे (Amphan cyclone impact). त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Amphan cyclone | अम्फान चक्रीवादळाचा चार दिवस प्रभाव, मान्सून महाराष्ट्रात वेळेवरच येणार : हवामान तज्ज्ञ
Follow us on

पुणे : पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे (Amphan cyclone impact). त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हे चक्रीवादळ पुढच्या सहा तासांत रौद्र रुप धारण करण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा प्रभाव साधारण चार दिवस राहील. त्यामुळे मान्सून केरळला 1 जूनला आणि राज्यात 7 जूनला वेळेवर दाखल होईल, अशी माहिती कृषी हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिले (Amphan cyclone impact).

मान्सूनच्या आगमनाची चाहूल आता सर्व देशवासियांना लागलेली आहे. मान्सून नेहमीच्या तुलनेत चार दिवस दक्षिण अंदमानला दाखल झाला आहे. मात्र सध्या या परिसरात अम्फान चक्रीवादळ तयार झालं आहे. हे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात बाष्प ओढून घेणार असल्याने मान्सून काहीसा कमजोर होणार आहे.

मान्सून दरवर्षी दक्षिण अंदमानला 20 मे रोजी दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस अगोदर म्हणजेच 16 तारखेला दाखल झाला आहे. मात्र अम्फान चक्रीवादळनं मोठ्या प्रमाणात बाष्प ओढून घेतलं जाणार आहे. चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात ढग विखुरले जाणार आहे. त्यामुळे ढग जातील तिथपर्यंत पाऊस पडेल. चक्रीवादळ बाष्प घेऊन गेल्यानं मान्सून थोडा कमजोर होईल‌.

दरम्यान पूर्व किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस होईल. ओरिसासह महाराष्ट्राच्या पूर्व भागातही पाऊस पडणार आहे. नांदेड, पूर्व विदर्भ, गडचिरोली, गोंदियासह काही ठिकाणी पाऊस पडेल.

या चक्रीवादळाचा प्रभाव साधारणत: चार ते पाच दिवस असेल. भारतावर सध्या हवेचा दाब हा 1001 ते 1010 पर्यंत आहे. या वेगानं मान्सून पुढे सरकणार आहे. त्यामुळे साधारण 7 जून रोजी मान्सूनचं केरळला आगमन होईल. तर राज्यात 7 जूनला आगमन होईल, असं रामचंद्र साबळे यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ अधाकाऱ्यांची बैठक बोलावली

दरम्यान अम्फान चक्रीवादळ संध्याकाळी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 185 किमी वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृह मंत्रालय आणि आपत्ती निवारणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदींची दुपारी 4 वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक असल्याची माहिती गृहमंत्री अमित शाह यांची दिली आहे.