काळा रंग, टपोरे डोळे आणि नजाकतभरा डौल! युरोपातून आलेलं दुर्मिळ शेंडी बदक पाहिलंत का?

| Updated on: Dec 01, 2022 | 4:50 PM

शेंडी बदक याचे इंग्रजी नाव टफ्टेड पोचार्ड आहे. याचा आकार 40ते45 सेमी असतो.

काळा रंग, टपोरे डोळे आणि नजाकतभरा डौल! युरोपातून आलेलं दुर्मिळ शेंडी बदक पाहिलंत का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः युरोप आणि आशिया खंडातील (Asia) इतर देशांतून हिवाळ्यात अनेक पक्षी भारतात येतात. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील जायकवाडीच्या जलाशयावर एकापेक्षा एक दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांचं दर्शन घडतं. यापैकीच एक खास पक्षी (Birds) म्हणजे शेंडी बदक. यावर्षी हिवाळ्यात नाथसागर या जलाशयावर हे लोभस असे शेंडी बदक दिसून आलेत. पक्षी अभ्यासकांनी त्यांची छायाचित्र टिपली. विशेष म्हणजे तब्बल 7 वर्षानंतर हे बदक या परिसरात आल्याची माहिती पक्षी अभ्यासकांनी दिली आहे.
रविवारी पक्षी निरिक्षण करत असताना मानद वन्य जीव रक्षक डॉ.किशोर पाठक यांना दुर्मिळ शेंडी बदक आढळले. याआधी जायकवाडी नाथसागर येथील जलाशयावर पिंपळवाडी येथे अशा प्रकारचे दोन बदर दिसले होते. यावेळी सदर बदक प्रजाती 25ते 30 चे संख्येने दिसून आले. या पक्षी निरीक्षणाच्या वेळी मिलिंद गिरधारी, डॉ.मिलिंद आणि मानसी पटवर्धन हेही उपस्थित होते.

वैशिष्ट्य काय?

  •  शेंडी बदक हे हिवाळ्यात भारतात येणारे बदक असून युरोप आणि आशिया खंडातील काही देशात आढळतात.
  •  मूळ युरोप इथे प्रजनन करणारे हे बदक हजारो किलोमीटर दूरवरून आपल्या भागात अन्नाच्या शोधात येतात.
  •  मध्य आशिया आणि युरोप खंडात बर्फ पडल्यावर अन्नाचे दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे हे बदक आपल्याकडे तलाव,समुद्र ,सरोवरे,नद्या याठिकाणी येतात.
  •  या पक्ष्यांचे भक्ष्य म्हणजे पाण्यातील छोटे मृदुकाय प्राणी,जलकीटक तसेच शैवाल, पान वनस्पतींचे बिया,कोंब खातात.
  • शेंडी बदक याचे इंग्रजी नाव टफ्टेड पोचार्ड आहे. याचा आकार 40ते45 सेमी असतो.
  •  नर व मादी दिसायला भिन्न असतात. नर शेंडी बदकाचा रंग चमकदार काळसर असून स्पष्ट शेंडी असते.
  •  शरीराच्या दोन्ही बाजू पांढरट रंगाच्या असतात.मादी शेंडी बदकाचा रंग फिकट तपकिरी असून दोन्ही बाजू फिकट पांढरी असतात.
  •  मादीला पण शेंडी असते. मादीचे डोळे गडद पिवळे असतात. शेंडी बदक नेहमी समूहात राहतात आणि पाण्यात डुबकी घेवून पाण्यातील भक्ष्य मिळवतात.शेंडी बदक याचे इंग्रजी नाव टफ्टेड पोचार्ड आहे. याचा आकार 40ते45 सेमी असतो.