Aurangabad | सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची LED Van द्वारे गावोगावी प्रसिद्धी, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

| Updated on: Apr 14, 2022 | 6:00 AM

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने, अनुसूचित जाती उपयोजनेमधून सामाजिक न्याय विभागाकडील योजनांची प्रसिद्धी व्हॅनद्वारे करण्यात येत आहे. या व्हॅनला ल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

Aurangabad | सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची LED Van द्वारे गावोगावी प्रसिद्धी, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते एलईडी व्हॅनचे उद्घाटन
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद | जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता एक अद्ययावर एलईडी व्हॅन (LED Van) फिरणार असून याद्वारे ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्यासाठीच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासन (Maharashtra Government) राबवित असलेल्या योजनांची माहिती व्हावी यासाठी शासन विविध माध्यमांचा वापर करुन प्रसिद्धी करण्यात येते. याचाच भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या (District information Office) वतीने एलईडी व्हॅनच्या माध्यमातून योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. या योजनांची माहिती घेऊन लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

सुनील चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने, अनुसूचित जाती उपयोजनेमधून सामाजिक न्याय विभागाकडील योजनांची प्रसिद्धी व्हॅनद्वारे करण्यात येत आहे. या व्हॅनला ल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी समाज कल्याणचे सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. या चित्ररथावर स्वाधार योजना, रमाई आवास, सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, मिनी ट्रक्टर आदि योजनांची माहिती देण्यात आली आहे. सोबतच विविध योजनांच्या ऑडिओ आणि व्हिडीओ जिंगल्स जाहिराती आणि माहिती पत्रिकेव्दारे देखील प्रसिध्द करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसवणार

जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, वस्तीगृहात सीसीटिव्ही लावणे आवश्यकच आहे. जेणे करुन विद्यार्थ्यांनी, कर्मचारी महिला, या सुरक्षित वातावरणात शिक्षण घेऊ शकतील, अशा सूचना संबंधित विभागाला राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲङ संगीता चव्हाण यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲङ संगीता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महिलांविषयक विविध विषयाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी निलेश गटणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे, पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत, सहायक कामगार आयुक्त गजानन बोरसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.टी.एस. मोटे यांची उपस्थिती होती.

इतर बातम्या-

CCTV VIDEO: सांगलीतील कुरळपमध्ये सोसायटी निवडणुकीत दगडफेक; पोलीस मारहाणीत ग्रामपंचायत सदस्य गंभीर

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे, जयश्री पाटीलही सहआरोपी; सरकारी वकिलांनी काय सांगितलं?