Aurangabad | राज गर्जना काही तासावर…औरंगाबादचं ऐतिहासिक मैदान सज्ज, पार्किंग, पाणी, खुर्च्या, लाऊडस्पीकरची काय काय व्यवस्था?

| Updated on: May 01, 2022 | 6:00 AM

ठरल्याप्रमाणे राज ठाकरे यांचं कालच औरंगाबादेत जंगी स्वागत झालं असून आज संध्याकाळी त्यांचे खास ठाकरी शैलीतील भाषण ऐकण्यासाठी अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे.

Aurangabad | राज गर्जना काही तासावर...औरंगाबादचं ऐतिहासिक मैदान सज्ज, पार्किंग, पाणी, खुर्च्या, लाऊडस्पीकरची काय काय व्यवस्था?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः मोठा गाजावाजा करत अखेर आज मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा औरंगाबादमध्ये होऊ घातली आहे. औरंगाबादमधील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा आयोजित केली आहे.याच ऐतिहासिक मैदानावर तत्कालीन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी अनेक सभा घेतल्या होत्या. त्या काळी हे मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरत असे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या सभेलाही हे मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरेल, असा दावा मनसैनिकांकडून करण्यात येत आहे. यासाठी मनसैनिकांनी गेल्या महिनाभरापासून जय्यत तयारीदेखील केली आहे. तांत्रिकदृष्ट्यादेखील ही सभा यशस्वी होण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावरकर, नितीन सरदेसाई, दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर सभेच्या काटेकोर नियोजनासाठी मेहनत घेत आहेत. ठरल्याप्रमाणे राज ठाकरे यांचं कालच औरंगाबादेत जंगी स्वागत झालं असून आज संध्याकाळी त्यांचे खास ठाकरी शैलीतील भाषण ऐकण्यासाठी अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे. राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुढीलप्रमाणे तयारी करण्यात आली आहे.

  1.  राज ठाकरे यांच्या भाषणासाठी 20 बाय 60 चे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याची पाहणी करेल तर व्यवस्थापनाची जबाबदारी मुंबईच्या कंपनीची असेल.
  2. औरंगाबादचं तापमान मागील तीन दिवसांपासून 42 अंशांपर्यंत पोहोचलं असून संध्याकाळपर्यंत उष्णतेची धग कायम आहे. दुपारपासूनच प्रेक्षकांची गर्दी होणार असल्याने आयोजकांनी 05 हजार लीटरच्या दोन पाण्याचे टँकर मागवले आहेत. याद्वारे सभेचं मैदान थंड केलं जाईल.
  3. राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी दीड हजार पाण्याचे जार मागवले जातील.
  4. सभेसाठी सहा टेम्पोभरून साहित्य, मजूर, शुक्रवारी सकाळीच शहरात दाखल झाले आहे.
  5. सभेच्या नियोजनाचे कंत्राट मुंबईच्या दोन कंपन्यांना दिले आहे. स्थानिक कंपनीला खुर्च्या, बांबू इतर किरकोळ कामे देण्यात आली आहेत.
  6. मैदानावर दोन्ही बाजूने फ्लाइंग स्पीकर लावले जातील.
  7. 32 सेटमधील स्पीकर मैदान व गर्दीचा अंतिम अंदाज घेऊन लावले जातील.एका सेटमध्ये 08 बॉक्स असे 24 सेट लागतील,असा अंदाज आहे.
  8. पूर्वीच्या काळातील स्पीकर जमिनीवर असल्याने शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत आवाज जात नसे. आता फ्लाइंग स्पीकर म्हणजे खाली ट्रक लावून त्यावर दोन्ही बाजूने हे साउंड लावले जातात.
  9. राज ठाकरे यांच्या भाषणासाठी 20 बाय 60 चे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याची पाहणी करेल तर व्यवस्थापनाची जबाबदारी मुंबईच्या कंपनीची असेल.
  10.  राज ठाकरे यांच्या सभेला येणाऱ्या प्रेक्षकांची वाहने पार्क करण्यासाठी ठराविक मैदाने दिली आहेत. कर्णपुरा मैदान, एमपी लॉ कॉलेज, एसबी मैदानावर ही पार्किंग असेल. तसेच खडेश्वरला पोलीस अधिकारी, महत्त्वाचे नेते व अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठी पार्किंग असेल.