उभी केळीची बाग भुईसपाट, व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याने पैठणचा शेतकरी हवालदिल

| Updated on: Nov 21, 2021 | 11:15 AM

बागवान आणि व्यापाऱ्यांकडून पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने आपल्याच हाताने केळीची बाग भुईसपाट केली. औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील हे विदारक चित्र.

उभी केळीची बाग भुईसपाट, व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याने पैठणचा शेतकरी हवालदिल
Follow us on

औरंगाबादः व्यापारी पिकांना योग्य भाव देत नसल्याने उभी केळीची बाग आपल्या हाताने भुईसपाट करण्याचा कठोर निर्णय पैठणच्या शेतकऱ्याने (Banana Farmer) घेतला. पैठण तालुक्यातील (Paithan Farmer)  हिरडपुरी गावातील ही घटना असून केळीला योग्य भाव नसल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला. त्याने आपल्याच हाताने केळीची बाग उध्वस्त केली.

दोन एकरावरील केळीची बाग उध्वस्त

पैठण तालुक्यातील हिरडपुरी गावातील शेतकऱ्याने आपल्याच हाताने हिरव्यागार केळी लगडलेली झाडं उपटून टाकली. बागवान लोक आणि व्यापारी केळीला योग्य भाव देत नसल्याने शेतकऱ्याने हे निराशाजनक कृत्य केले.

नापिकीला कंटाळून सिल्लोडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून शुक्रवारी रात्री राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. तालुक्यातील पळशी येथील सोनारी रस्त्यावर असणाऱ्या आपल्या स्वतःच्या शेतातील घरात भिकन बडक या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सोनारी शिवारात त्यांची तीन एकर जमीन आहे. मुलीच्या लग्नाची चिंता, मुलांचे शिक्षण व सततच्या नापिकीला कंटाळून या शेतकऱ्याने घगरात गळफास घेऊन जीवन संपवले.

इतर बातम्या-

माफी मागून चालणार नाही, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पीएम केअर फंडातून भरपाई द्या; संजय राऊतांची मागणी

कॅन्सरग्रस्त वडील, आजारी आई, पदरात दोन पोरं; व्हिडीओत खळबळजनक आरोप, अकोल्यात 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या