Aurangabad Jobs: स्किल डेव्हलपमेंट कोर्स करायचाय? विद्यापीठाच्या केंद्रातून 5 वर्षात 200 विद्यार्थ्यांना रोजगार

| Updated on: Aug 29, 2021 | 7:40 PM

या केंद्रातील दोन कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. केंद्राचे, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 24 व त्यापेक्षा अधिक इंडस्ट्रीज व संस्थासोबत सामंजस्य करार झालेले आहेत.

Aurangabad Jobs: स्किल डेव्हलपमेंट कोर्स करायचाय? विद्यापीठाच्या केंद्रातून 5 वर्षात 200 विद्यार्थ्यांना रोजगार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
Follow us on

औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad) केंद्राच्या वतीने मागील पाच वर्षात 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. तसेच पाच लघुउद्योजकही घडले आहेत.  कौशल्य विकास केंद्रातील दोन कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. केंद्राचे, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 24 व त्यापेक्षा अधिक इंडस्ट्रीज व संस्थासोबत सामंजस्य करार झालेले आहेत.

ऑटोमोबाईल व इंडस्ट्रीयल ऑटोमेशन हे दोन कोर्स

या केंद्रात बॅचरल ऑफ व्होकेशनल स्टडीज अंतर्गत ऑटोमोबाईल व इंडस्ट्रीयल ऑटोमेशन हे दोन कोर्स चालविले जातात. या दोन्ही विभागात प्रत्येकी ५० जागा आहेत. बारावी, वाणिज्य, कला, विज्ञान, एमसीव्ही किंवा आयटीआय उत्तीर्ण झालेला हा विषयाला प्रवेशास पात्र आहे. पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी हा तीन वर्षाचा आहे, यातील दोन वर्षे विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रशिक्षण दिले जाते व तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी इंडस्ट्रीत पाठवले जाते. बी.व्होक.(ऑटोमोबाईल) या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मूलभूत वाहन जोडणी व दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. बी.व्होक. (इंडस्ट्रियल ऑटोमेशन) या अभ्यासक्रमांतर्गत रोबोट, कंट्रोल पॅनल, घरगुती वायरिंग या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.

..या कंपन्यांत प्रशिक्षणाची संधी

विद्यापीठात कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी Endurance, Savera Auto, Rucha Engineers, Varroc, Sanjeev Auto, Sanya Motors, NAC group of Industry, Sangram Auto, Yeshashri Group, Electromates Robotics & Automation, Ellantra Automation आदी कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी या कोर्सद्वारे उपलब्ध होते.

मराठवाड्यात घडतेय कुशल मनुष्यबळ

मराठवाडा विभागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांनुसार, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची आवश्यकता आहे. 2015 मध्ये, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण केंद्रास सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, त्याअनुषंगाने या केंद्राचे दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्र असे नामकरण करण्यात आले. या केंद्राअंतर्गत वरील दोन कोर्स चालवले जातात. या प्रकल्पांतर्गत चिखलठाण, नरसिंगपूर, देवगाव, अंधानेर, नागद, लोहगाव ही कन्नड तालुक्यातील सहा गावे तीन वर्षासाठी दत्तक घेण्यात आली आहे. सुसज्ज व अद्ययावत प्रयोगशाळा, कार्यशाळा, अद्यावत उपकरणे, कुशल मनुष्यबळ निर्मिती, कालानुरुप बदलता अभ्यासक्रम ही या केंद्राची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. (students got job from BAMU skill development center, Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या:

Aurangabad Crime : ‘त्या’ खवले मांजर चोरांचा जामीन नाकारला, हर्सूल कारागृहात रवानगी

औरंगाबादच्या ‘बर्थ डे’ ची सगळीकडे चर्चा, झाडांच्या पहिल्या वाढदिवसाला सेंद्रीय खतांचा यम्मी केक