तुम्ही हलक्यावर घेऊ नका, नाहीतर तुम्हाला जड जाईल, IAS सुनील केंद्रेकरांचा अधिकाऱ्यांना रोखठोक इशारा

| Updated on: Mar 17, 2021 | 1:56 PM

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (IAS Sunil Kendrekar) यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. "कोरोना नियम मोडणाऱ्यांना हलक्यात घेऊ नका त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अन्यथा मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल".

तुम्ही हलक्यावर घेऊ नका, नाहीतर तुम्हाला जड जाईल, IAS सुनील केंद्रेकरांचा अधिकाऱ्यांना रोखठोक इशारा
Sunil Kendrekar
Follow us on

बीड : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा (Beed Corona update) वाढतच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नाईट कर्फ्यू लावण्यात (Beed night curfew) आला आहे. असं असलं तरी प्रशासनाकडून मास्क न घालणाऱ्यांवर किंवा कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यावरुन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (IAS Sunil Kendrekar) यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. कोरोना नियम मोडणाऱ्यांना हलक्यात घेऊ नका त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अन्यथा मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल, असा सज्जड दम केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना दिला.  कोरोनासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होती. यावेळी केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. (Beed corona update IAS Sunil Kendrekar in action mode ask officers to take action  otherwise he will take decision)

सुनील केंद्रेकर हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. जनतेची कामं वेळेवर होण्यासाठी ते कटिबद्ध असतात. त्यांचा साधेपणाही राज्याला परिचीत आहे.  काही दिवसापूर्वीच त्यांचा पत्नीसोबत भाजी मंडईत भाजी खरेदी करताना फोटो व्हायरल झाला होता. सामान्य माणसाप्रमाणे खांद्यावर पिशवी घेऊन ते बाजारात दिसले होते.

बीडमधील कोरोना स्थिती

सध्या बीडमधील कोरोना स्थिती बिकट आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या  21325 वर पोहोचली होती. त्यापैकी 18754 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत जिल्ह्यात 581 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1984 इतकी आहे.

बीड कोरोना रुग्ण 

  • एकूण बाधित रुग्ण- 21325
  • बरे झाले रुग्ण- 18754
  • आतापर्यंत मृत्यू- 581
  • अॅक्टिव्ह रुग्ण- 1984

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाले

माजलगावात शहरातील गणपती मंदिर आणि सोळंके महाविद्यालयात गेल्या तीन दिवसांपासून व्यापाऱ्यांची अॅटिजन चाचणी सुरु आहे. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघालेले 3 रुग्ण कोणालाही न सांगता पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे , प्रशासनाने व्यापाऱ्यांना अँटिजन चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मागील 3 दिवसांपासून अँटिजन चाचणीसाठी दोन ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले. इथे तीन दिवसांत 1680 व्यापायांनी चाचणी केली. यात 87 व्यापारी पॉझिटिव्ह आले. मंगळवारी गणपती मंदिरात चाचणी झाल्यानंतर पॉझिटिव्ह आलेले 3 रुग्ण कोणालाही न सांगता फोनवर बोलत बोलत गुपचूप निघून गेले. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

80 वर्षांची परंपरा खंडित

कोरोनाने सगळ्यांनाच जेरीस आणले. परंतु जावई मंडळींसाठी तो पर्वणी ठरु लागला आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र केज तालुक्यातील विडा येथील जावयांचा जीव भांड्यात पडला आहे. दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावर बसून जावयाची मिरवणूक काढण्याची 80 वर्षांची परंपरा यंदा जमावबंदी आदेशामुळे खंडित होण्याची शक्यता आहे. विडा गावात जावयांना गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे.

(Beed corona update IAS Sunil Kendrekar in action mode ask officers to take action  otherwise he will take decision)

संबंधित बातम्या   

मराठवाड्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी सुनिल केंद्रेकरांचा जालिम उपाय

धरण रिकामं असताना काय करत होतात? सुनील केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं