Beed | ध्वजारोहण सुरु असतानाच शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, बीडमध्ये काय घडलं?

| Updated on: Sep 17, 2022 | 10:29 AM

अनेक दिवसांपासून या शेतकऱ्याच्या जमिनीचा वाद प्रलंबित आहे. अनेक वेळा मागणी करून देखील यावर प्रशासनाच्या वतीने कारवाई होत नसल्याने शिवाजी उपाडे यांनी पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Beed | ध्वजारोहण सुरु असतानाच शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, बीडमध्ये काय घडलं?
बीडमध्ये शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीडः मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (Marathwada Mukti sangram Din) संपूर्ण मराठवाड्यात आज शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. बीडमध्ये जिल्हाधिकारी  कार्यालयातही ध्वजारोहण (Flag hosting) झालं. मात्र हा कार्यक्रम सुरु असतानाच एक दुर्दैवी घटना घडली. आपल्या मागण्या मान्य करत नाही, असा आरोप करत एका शेतकऱ्याने (Farmer) अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. शिरसाळा येथील शिवाजी उपाडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. अनेक दिवसांपासून या शेतकऱ्याच्या जमिनीचा वाद प्रलंबित आहे. अनेक वेळा मागणी करून देखील यावर प्रशासनाच्या वतीने कारवाई होत नसल्याने शिवाजी उपाडे यांनी पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात पोलिसांनी त्याच्या हातामधील रॉकेल व माचीस हिसकावून घेऊन या शेतकऱ्याला ताब्यात घेतला आहे.