नाशिकच्या भाजप आमदारांचा मंत्रीपदाचा वनवास संपणार? मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची लागणार वर्णी?

| Updated on: Oct 24, 2022 | 7:19 PM

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याने चारही खासदार इच्छुक आहेत, त्यात महिला खासदार यांच्यामध्ये सीमा हीरे आणि देवयांनी फरांदे यांच्यात रस्सीखेच होणार आहेत

नाशिकच्या भाजप आमदारांचा मंत्रीपदाचा वनवास संपणार? मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची लागणार वर्णी?
Image Credit source: Google
Follow us on

Nashik News : राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा दूसरा विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याचा राजकीय बॉम्ब फोडला आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात नाशिकच्या भाजप आमदारांना (Nashik BJP MLA) मंत्रीपद मिळेल का ? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी चर्चा जोर धरू लागली होती. त्यातच आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanavis) यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं जाहिर केलं आहे. त्यामुळे नाशिक शहरातील आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले आणि नाशिक ग्रामीण मधील राहुल आहेर यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नाशिकला कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री निवडत असतांना गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा होईल अशी माहिती होती, मात्र शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांच्या नावाची घोषणा झाल्याने भाजपच्या गोटात नाराजी पसरली होती.

दरम्यान आता राज्यमंत्री मंडळाचा विस्तार होणार असल्याने चारही खासदार इच्छुक आहेत, त्यात महिला खासदार यांच्यामध्ये सीमा हीरे आणि देवयांनी फरांदे यांच्यात रस्सीखेच होणार आहेत.

तर पुरुष खासदार म्हणून शहरातील राहुल ढीकले यांचे नाव आघाडीवर आहे, याशिवाय राहुल आहेर यांचाही विचार केला जाऊ शकतो.

देवयानी फरांदे यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या नावाला स्थानिक पातळीवरुन विरोध झाल्यास मितभाषी म्हणून सीमा हीरे यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

याशिवाय राहुल आहेर यांचा विचार हे ग्रामीण भागातील आणि माजी मंत्री दौलतराव आहेर यांच्या कुटुंबातील असल्याने त्यांनाही मंत्रीपदाची माळ गळ्यात पडू शकते.

मात्र, शहरात एकही मंत्रीपद नसल्याने राहुल ढिकले यांच्या नावाचा अधिक होऊ शकतो त्यात गिरीश महाजन यांच्याशी संबंध चांगले असल्याने त्यांची वर्णी लागण्याची संधी जास्त आहे.

अशी सर्व परिस्थिती असली तरी चारही आमदरांपैकी कुणाच्याही नावावर शिक्का मोर्तब करायचा असल्यास गिरीश महाजन यांची पसंती महत्वाची असणार आहे.

कॅबिनेट मंत्री पदाची शक्यता कमी असली तरी दुसरीकडे राज्यमंत्री तरी पदरात पडावे यासाठी चारही आमदार देव पाण्यात ठेवून आहेत.