सेना-भाजपच्या भाऊबंदकीवरुन दानवेंचं ‘भाजपपुराण’

| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

उस्मानाबाद : राजकारणात भाजपच मोठा भाऊ आहे, तर शिवसेना लहान भाऊ आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनाला पुन्हा एकदा डिवचलं आहे. राजकारणात वयानुसार लहान-मोठे ठरत नसतं, तर कोणत्या पक्षाकडे किती पदे आहेत, यावरुन ठरतं, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?    भाजप मोठा भाऊ असून शिवसेना लहान भाऊ आहे, […]

सेना-भाजपच्या भाऊबंदकीवरुन दानवेंचं भाजपपुराण
Follow us on

उस्मानाबाद : राजकारणात भाजपच मोठा भाऊ आहे, तर शिवसेना लहान भाऊ आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनाला पुन्हा एकदा डिवचलं आहे. राजकारणात वयानुसार लहान-मोठे ठरत नसतं, तर कोणत्या पक्षाकडे किती पदे आहेत, यावरुन ठरतं, असेही रावसाहेब दानवे म्हणाले.

रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?   

भाजप मोठा भाऊ असून शिवसेना लहान भाऊ आहे, राजकारणात वयानुसार लहान मोठे ठरत नसते , ते सत्तेवरुन ठरते, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केलं.

“राज्यात भाजपचे 5 हजार सरपंच, 15 महापालिका, 10 जिल्हा परिषद, 80 नगर परिषद, मुख्यमंत्री, तर देश पातळीवर पंतप्रधान, राष्ट्रपती हे सर्व भाजपचे आहेत. राजकारणात वयानुसार लहान मोठे ठरत नसते तर कोणत्या पक्षाकडे किती पदे आहेत यावर ठरते की लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण हे ठरतं.” – रावसाहेब दानवे

राम मंदिरासाठी तूर्तास कायद शक्य नाही : रावसाहेब दानवे

भाजपचे लोकसभा व राज्यसभेत 2/3 बहुमत नसल्याने राम मंदिरबाबतचा कायदा तूर्तास तरी करणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिला. राम मंदिर लवकरात लवकर बांधण्याबाबत कायदा करावा, अशी मागणी सत्तेतील सहभागी शिवसेनेसह अनेक हिंदुत्त्ववादी संघटनानी केली असून त्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला, तर विश्व हिंदू परिषदेने नागपुरात हुंकार रॅली काढली .

“राम मंदिर बांधण्याबाबत अध्यादेश काढून उपयोग होणार नाही, घटनात्मक बदल करायला म्हणजे कायदा करायला 2/3 बहुमताची गरज असते, ती भाजपकडे नाही. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. याशिवाय राज्यसभेत बहुमत नाही, त्यामुळे कायदा बनवणे शक्य नाही. कदाचित 2019 च्या निवडणुकीत २/३ बहुमत शिवसेनेसह मिळाले, तर कायदा बनवता येईल.”, असेही दानवे म्हणाले.

राम मंदिर व्हावे ही देशातील सर्व हिंदू लोकांची भावना आहे , राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तो राजकीय विषय होऊ शकत नाही. भाजप मंत्री सोबत काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते जरी हुंकार रॅलीत आले तरी वेगळे वाटू नये. 1990 व 1992 च्या दोन्ही वेळी आम्ही हा लढा लढलो, त्यावेळी शिवसेना सोबत होती. आताही त्यांनी सोबत राहावे. भाजपशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष जरी यात सोबत आले, तर आणखी चांगले होईल, सर्वानी एकत्र येऊन यातून मार्ग काढावा, असे प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले.